Today Rashi Bhavishya, 18 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत बसू नका. विरोधक मन बेचैन करतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ (Taurus Horoscope Today ):- कामाचा कंटाळा करू नका. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. विनाकारण अडचणी सामोर्या येऊ शकतात. मिथुन (Gemini Horoscope Today ):- भावंडांशी मैत्रीचे नाते ठेवा. व्यवहार व नाते यात गफलत करू नका. दिनक्रम व्यस्त राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. मनोबल वाढीस लागेल. कर्क (Cancer Horoscope Today ):- जुनी येणी वसूल होतील. आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. व्यावसायिक योजना गतिमान होतील. भावनिक निर्णय घेऊ नका. सिंह (Leo Horoscope Today ):- प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नवीन कामात जपून पाऊले टाका. कुटुंबासोबत काळ व्यतीत कराल. अपचनाचा त्रास संभवतो. मानसिक शांतता राखावी. कन्या (Virgo Horoscope Today ):- प्रखर मत नोंदवताना काळजी घ्या. गैरसमज होऊ देऊ नका. हातातील काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. संयम व धैर्य राखावे. कामाची योग्य आखणी करावी. तूळ (Libra Horoscope Today ):- लोकांना योग्य तोच सल्ला द्यावा. कामाची दगदग राहील. थोडा स्वत:साठी वेळ काढावा. बोलण्यातून मान कमवाल. मिळकतीचे नवीन मार्ग सापडतील. वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):- गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे. वडीलधार्यांचे सल्ले ऐकावेत. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. वाणी संयमित ठेवा. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. धनू (Sagittarius Horoscope Today ):- पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरासाठी काही खरेदी कराल. कार्यालयीन व्यक्तींशी मतभेद टाळावेत. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. मकर (Capricorn Horoscope Today ):- कौटुंबिक कामाचा भार उचलावा. आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस अनुकूल असेल. थोडीफार धावपळ संभवते. जागेच्या व्यवहारात गाफिल राहू नका. कुंभ (Aquarius Horoscope Today ):- व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारी वर्गाला दिलासादायक दिवस. कौटुंबिक शांतता जपावी. क्षुल्लक वादाला तोंड फुटू देऊ नका. वाहनाचे काम निघू शकते. मीन (Pisces Horoscope Today ):- व्यवसायिकांनी संधी ओळखावी. आजचा दिवस अनुकूल असेल. कामाची व्याप्ती वाढेल. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. प्रवास सत्कारणी लावाल. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर