मेष:-

जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
Shani Nakshatra Gochar On 6th April 2024
३ दिवसांनी शनीचे नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धन-धान्याने भरण्याचे संकेत

वृषभ:-

उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी.

मिथुन:-

मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.

कर्क:-

स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.

सिंह:-

घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तू खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.

कन्या:-

कष्टाच्या  मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. अचानक खर्च उद्भवू शकतात.

तूळ:-

अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल.

वृश्चिक:-

केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील.

धनू:-

आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मकर:-

आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कुंभ:-

कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यवसायिकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा.

मीन:-

नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात. घरात अतिथी जमतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर