scorecardresearch

आजचं राशीभविष्य, सोमवार २७ जून २०२२

आजचं राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींनी गृहसौख्याला प्राधान्य द्यावे. मनात उगाचच चिंता निर्माण होतील.

Daily Horoscope in Marathi, Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

मेष:-

कामात एकसूत्रता ठेवावी. घरात काही बदल करून पहावेत. सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. अधिक चिकाटीने कामे करावीत.

वृषभ:-

जुन्या विचारात अडकून राहू नका. वडीलांची नाराजी दूर करावी लागेल. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा लागेल. न्यायी वृत्तीने वागाल. कर्मठ विचार दर्शवू नका.

मिथुन:-

पारंपरिक कामात यश येईल. वडिलोपार्जित कामे धनदायक ठरतील. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. मोहात अडकू नका. स्पष्ट विचार नोंदवा.

कर्क:-

आधुनिक गोष्टी जाणून घ्याव्यात. हट्टीपणे विचार कराल. स्वत:च्या इच्छेपुढे इतर गोष्टी दुय्यम वाटतील. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

सिंह:-

सहकारी लोकांची चांगली साथ मिळेल. कामात समाधानी असाल. नातेवाईक दुरावू शकतात. कामानिमित्त प्रवास घडेल. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.

कन्या:-

व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागाल. राजकारणी विचार मांडाल. नसते डावपेच खेळायला जाऊ नका. चिकाटीने कामे कराल. चटकन निराश होणे टाळावे.

तूळ:-

गृहसौख्याला प्राधान्य द्यावे. मनात उगाचच चिंता निर्माण होतील. काही गोष्टी तडजोडीने स्वीकाराव्या लागतील. व्यावसायिक गुंतवणूक करावी लागेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

वृश्चिक:-

खोलवर विचार करावा लागू शकतो. काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. भावंडांची समजूत काढावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. स्वकर्तुत्वावर अधिक भर द्याल.

धनू:-

चिकाटीने कामे करून दाखवाल. विचार करण्यात अधिक वेळ घालवाल. मोजक्याच शब्दांचा वापर करावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल. धार्मिक कामात मदत करावी.

मकर:-

मनातील निराशा झटकून टाकावी. उगाचच दडपण घेऊन राहू नका. नवीन गोष्टी समजून घ्याव्यात. आपली वैचारिकता बदलून पहावी. जोडीदारापाशी मन मोकळे करून पहावे.

कुंभ:-

काही कामे रेंगाळून पडू शकतात. चिकाटी सोडून चालणार नाही. मनातील नकारात्मक विचार दूर सारावेत. अनावश्यक खर्च टाळावा. मागचा-पुढचा नीट विचार करावा.

मीन:-

थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. मेहनतीला मागे हटू नका. तुमचे ज्ञान उपयोगी पडेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 27 june 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या