मेष:- आनंदी भावना वाढीस लागेल. धार्मिक कार्यात सहकार्य कराल. व्यवसायात नवीन बादल होतील. त्याचा नंतर फायदा मिळेल. आरोग्य बाबत जागरूक रहा. वृषभ:- कामात क्षुल्लक अडचणी येतील. नोकरवर्गा कडे लक्ष ठेवा. कौटुंबिक बाबतीत चालढकल करू नका. शेजारी सहकार्य करतील. सकारात्मक विचार करा. मिथुन:- जुनी कामे पूर्ण होतील. नवी गुंतवणूक कराल. कौटुंबिक दुरावा वाढू शकतो. वाहन विषयक अडचणी येऊ शकतात. घाई घाईने निर्णय घेऊ नका. कर्क:- अध्यात्माविषयी ओढ वाढेल. भौतिक सुखसोयी वाढतील. विवेक बुद्धीने कामे करा. इतरांच्या उणिवा काढू नका. अभिमान वाढू शकतो. सिंह:- मौल्यवान गोष्टी पासून लाभ होईल. गरीबांना मदत कराल. लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. कार्य क्षमतेत वाढा होईल. अध्यात्मात रस घ्याल. कन्या:- तुमचा प्रभाव वाढेल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. अनावश्यक खर्चा सामोरे येतील. मनाला येईल तसे वागाल.. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तूळ:- मेहनतीमुळे तब्येत नरम राहील. चार चौघात संयमाने वागाल.. कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. लोक तुमचे कौतुक करतील. वृश्चिक:- आजचा दिवस संमिश्र आहे. पोटाच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च होतील. त्यामुळे मन खट्टू होईल. मंगल कार्यालयात सहभाग घ्याल. धनू:- सामाजिक उपक्रमात वेळ घालवाल. भौतिक गोष्टीत फार अडकू नका. मन जवळच्या माणसापाशी मोकळे करा. आरोग्याकडे लक्ष ठेवा. रखडलेले पैसे मिळतील. मकर:- स्वत:चे निर्णय क्षमता वापरा. सामाजिक वादात अडकू नका. खर्च फायदेशीर ठरेल. परोपकाराची भावना जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कुंभा:- नवीन संकल्प कराल. आध्यात्मिक आवड जोपासाल. घरात तुमच्या आमचे कौतुक होईल. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. आवडते छंद जोपासाल. मीन:- नसत्या चिंता करू नका. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. बढतीसाठी प्रयत्न करा. बोलण्यातून प्रभाव पाडाल. नातेवाईकांची गाठ पडेल. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर