मेष:-

घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. गायन कलेचे कौतुक होईल. छंद जोपासायला वेळ मिळेल.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

वृषभ:-

नवीन गोष्टी समर्थपणे पेलाल. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवावी. घर खर्च वाढू शकतो. वैचारिक चंचलता जाणवेल. कामात स्थैर्य ठेवावे.

मिथुन:-

आपली हौस भागवाल. गरज पडल्यास थोडे मागे यावे. मनातील निराशा झटकून टाकावी. जोडीदाराला शा‍ब्दिक दिलासा द्यावा लागू शकतो. नियमांचे काटेकोर पालन करावे.

कर्क:-

स्वभावाला काहीशी मुरड घालावी लागेल. पोटाची काळजी घ्यावी लागेल. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. अति विचारात गढून जाऊ नका. झोपेची तक्रार कमी होईल.

सिंह:-

तरुण लोकांशी मैत्री कराल. जवळच्या लोकांच्या गाठी पडतील. तुमची कला चार चौघांसमोर सादर करता येईल. भागिदारीतून नफा मिळू शकेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या:-

केलेल्या कामातून समाधान मिळेल. चंचलतेला आवर घालावी लागेल. सहकारी वर्ग तुमच्यावर खुश असेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. पत्नीशी मतभेदाची शक्यता.

तूळ:-

बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागेल. कामात अपेक्षित यश मिळेल. समस्येकडे संधी म्हणून पहावे. जुनी गुंतवणूक फळाला येईल. शेअर्सच्या मार्गाने नफा कमवाल.

वृश्चिक:-

व्यावसायिक वातावरण पूरक राहील. घरातील कामासाठी वेगळा वेळ काढावा लागेल.  सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. अडचणीतून मार्ग काढण्याची तयारी ठेवावी. जोडीदाराकडून समजुतीची अपेक्षा राहील.

धनू:-

सारासार विचार करण्यावर भर द्याल. आशावादी दृष्टीकोन वाढीस लावावा. योग्य तर्क वापरावा लागेल. स्वत:चा मान राखून वागाल. खिलाडु वृत्तीने वागाल.

मकर:-

धाडसाला दूर दृष्टीची जोड द्यावी. कौटुंबिक वातावरणातून आनंद मिळेल. घेतलेली जबाबदारी हिंमतीने पार पाडाल. शांत चित्ताने विचार करावा. तुमची चिकाटी कौतुकास पात्र ठरेल.

कुंभ:-

व्यावहारिक ज्ञान वापरून कामे पूर्ण कराल. स्मरण शक्ति च्या जोरावर बारकावे लक्षात घ्याल. आपल्या ज्ञानाचा योग्य वेळी वापर कराल. टोचून बोलणे टाळण्याचा प्रयत्न करा. अति तिखट पदार्थ खाणे टाळा.

मीन:-

वरिष्ठांपुढे नवीन विचार मांडाल. हट्टीपणा कमी करावा लागेल. पित्त विकार बळावू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. काही कामे तुमचा कस पाहतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर