काही जणांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो. मंगळ दोषामुळे विशेषतः लग्नकार्यात अडथळे येतात, असे मानले जाते. जर पती-पत्नीपैकी कुणाला मंगळ दोष असेल तर दुसऱ्याला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हा दोष लग्नापूर्वी सुधारला जाऊ शकतो, याासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार मंगळ कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीच्या चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात असेल तर मंगळ खूप प्रभावी असतो. यामुळे कुंडलीत मंगल दोष निर्माण होतो. याशिवाय जेव्हा मंगळ राशीच्या आठव्या भावात असेल तेव्हा त्याचा प्रभाव खूप वाढतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषांच्या मते, मुलाच्या कुंडलीतील मंगल दोष काही साध्या उपायांनी दूर केला जातो. कधीकधी मुलाच्या वयाच्या २८ वर्षानंतरही मंगळ दोष असाच दूर होतो. याउलट हा दोष मुलीच्या कुंडलीत असल्यास त्याचा प्रभाव दीर्घकाळ दिसून येतो. अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीचे लग्न झाले तर तिचे वैवाहिक जीवनात अडचणी येतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to remove mangal dosh from kundali rmt
First published on: 04-03-2022 at 11:23 IST