Jupiter and Ketu Shadashtak Yog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, छाया ग्रह केतू ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. हा ग्रह एका राशीत सुमारे १७ महिने राहतो. अशा परिस्थितीत, पुन्हा त्याच राशीत परत येण्यासाठी त्याला सुमारे १८ वर्षे लागतात. गेल्या वर्षी म्हणजेच ३० ऑक्टोबर २०२३ रोजी केतूने कन्या राशीत प्रवेश केला होता. जिथे तो २०२५ पर्यंत राहणार आहे. अशा स्थितीत केतू कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा संयोग करेल, याने विविध राशींवर परिणाम होईल. सध्या देवांचा गुरु मेष राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत केतू आणि गुरु यांच्यामध्ये ‘षडाष्टक’ नावाचा अशुभ योग तयार होत आहे. १ मे रोजी गुरुचा वृषभ राशीत प्रवेश झाल्यानंतर हा योग संपेल. मेष राशीमध्ये तयार झालेला हा योग अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. परंतु, काही राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. षडाष्टक योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल जाणून घ्या….

मेष (Mesh Zodiac)

षडाष्टक योग तयार झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. मेष राशीच्या लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तसेच त्यांना आरोग्याबाबतही थोडे सावध राहण्याची गरज आहे. कोणतेही जुने कर्ज फेडणे त्यांना शक्य होणार नाही, याबरोबर तुम्ही अनावश्यक खर्चामुळे त्रस्त राहू शकता. कर्ज खूप वाढू शकते. याशिवाय तुम्ही कोर्ट केसेसमध्ये अडकून राहू शकता. कुटुंबात काही ना काही कारणावरून मतभेद होऊ शकतात. अध्यात्माकडे काही प्रमाणात रस वाढू शकतो. केतूचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीत आरोग्याची पूर्ण काळजी घेण्याची गरज भासू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jupiter and ketu make shadshtak yog in mesh rashi these zodiac sign faces financialand personal problems sjr
First published on: 01-03-2024 at 12:27 IST