scorecardresearch

होळीनंतर ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकणार? गुरुदेव देणार प्रचंड धनलाभाची संधी

Guru Gochar In Aries: ज्योतिष शास्त्रानुसार गुरु मेष राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण ३ राशीच्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते.

guru gochar 2023
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम'

Guru Gochar In Aries: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी त्यांची राशी बदलतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि संपूर्ण जगतावर होताना दिसतो. तसेच हे संक्रमण काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. होळीनंतर गुरु बृहस्पति मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांना यावेळी आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

सिंह राशी

गुरूचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीतून नवव्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तसंच यावेळी तुम्हाला नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला ठरू शकतो. यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळणे अपेक्षित असते. याशिवाय तुमचे रखडलेले कामही या काळात पूर्ण होईल. यासोबतच या काळात तुम्ही काम आणि व्यवसायासाठी प्रवास करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचे संक्रमण शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण बृहस्पति तुमच्या संक्रमण कुंडलीच्या सातव्या घरात प्रवेश करेल. जे भागीदारी आणि वैवाहिक जीवनाचे स्थान मानले जाते. त्यामुळे हा काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. यासोबतच विवाहित लोकांच्या आयुष्यात आनंद वाढेल. तुम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. दुसरीकडे, जे अविवाहित आहेत त्यांना याकाळात लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. दुसरीकडे, जर तुम्हाला भागीदारी व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या कालावधीत सुरू करू शकता.

( हे ही वाचा: शनिदेव सोन्याच्या पायांनी मार्गी होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? वर्षभर होऊ शकतो प्रचंड धनलाभ)

धनु राशी

गुरूचा राशी बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीतून पाचव्या भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या काम-व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. तसंच उच्च संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ फायदेशीर आहे. यासोबतच तुम्हाला शनी साडेसतीपासूनही मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे एप्रिलपासून तुमच्या प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतील.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:57 IST