Janmashtami Date And Shubh Muhurat 2025: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते. तसेच इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात. श्रावणाला सुरुवात झाली की सर्वांत आधी नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो.
हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी या तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. सांगायचे तर, त्या दिवशी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात भगवान विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.
यंदा अष्टमीची तिथी दोन दिवसांवर आली असून, नेमकी कोणत्या दिवशी जन्माष्टमी साजरी करावी याबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. चला तर मग जाणून घेऊ या वर्षीची जन्माष्टमी नेमकी कधी आहे. तसेच त्याची तिथी आणि इतर माहिती…
कृष्ण जन्माष्टमी कधी आहे? (Krishna Janmashtami Date 2025)
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आरंभ- १५ ऑगस्ट रोजी रात्री ८:१९ वाजता
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी समाप्त- १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:०४ वाजता
कृष्ण जन्माष्टमी २०२५ तारीख- या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी केली जाईल.
कृष्ण जन्माष्टमी पूजा मुहूर्त (Krishna janmashtami Puja Muhurat 2025)
कृष्ण जन्माष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त – १६ ऑगस्ट रोजी रात्री १२:०४ ते १२:४७
एकूण कालावधी – फक्त ४३ मिनिटे
मध्यरात्रीचा क्षण– १६ ऑगस्ट रोजी रात्री १२:२६ वाजता
चंद्रोदयाची वेळ- रात्री १०:४६
जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्राची वेळ
रोहिणी नक्षत्र प्रारंभ- १७ ऑगस्ट रोजी पहाटे ४:३८ वाजता
रोहिणी नक्षत्र समाप्ती- १८ ऑगस्ट रोजी पहाटे ३:१७ वाजता
जन्माष्टमीचा उपवास अनेक लोक सूर्योदयापासून मध्यरात्रीपर्यंत करतात. अनेक लोक सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात. काही कृष्णभक्त रोहिणी नक्षत्र किंवा अष्टमी तिथी संपल्यानंतर उपवास सोडतात.
श्रीकृष्ण जन्माष्टमीला या मंत्रांचा जप करा (Janmashtami Mantra)
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
ॐ कृं कृष्णाय नमः
क्लीं ग्लौं क्लीं श्यामलांगाय नमः
ॐ नमः भगवते श्रीगोविन्दाय: