Krishna Janmashtami 2025 Horoscope: हिंदू धर्मात जन्माष्टमीला अत्यंत महत्वपूर्ण आणि पवित्र मानले जाते. हा दिवस ज्योतिषशास्त्रातही खूप खास मानला जातो. या दिवशी ग्रहांची आणि नक्षत्रांची स्थितीत बदल होतो, ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पाहायला मिळतो. यंदा १५ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जात आहे.
पंचांगानुसार, १६ ऑगस्ट रोजी चंद्र वृषभ राशी प्रवेश करणार असून चंद्राच्या या राशीतील प्रवेशाने १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.
जन्माष्टमीचा दिवस ‘या’ राशीसाठी फायदेशीर
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी जन्माष्टमीला निर्माण झालेली चंद्राची स्थिती अत्यंत फायदेशीर असेल. या काळात तुम्हाला पदोपदी यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
कर्क (Kark Rashi)
मकर राशीसाठी हा काळ सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मनासारखी नोकरी मिळेल.या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. भौतिक सुख प्राप्त होईल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. भौतिक सुख प्राप्त कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आयुष्यात अनेक दिवसांपासून येणारे अडथळे दूर होतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)