Mahalaxmi Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो, शिवाय त्यातून शुभ संयोग आणि राजयोग निर्माण होतात, ज्याचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतो. चंद्र आणि मंगळाच्या युतीने हा राजयोग निर्माण होत आहे, ज्यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते.

पंचांगानुसार, चंद्र २८ जुलै रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी कन्या राशीमध्ये प्रवेश करणार असून हा राजयोग ३१ जुलैपर्यंत या राशीत राहील.

महालक्ष्मी राजयोग ‘या’ तीन राशीचे चमकवणार भाग्य

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींच्या सहाव्या घरात महालक्ष्मी योगामुळे खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या तिसऱ्या घरात महालक्ष्मी राजयोग निर्माण होईल. शुभ प्रभाव अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनु (Dhanu Rashi)

महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव धनु राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)