Mahashivratri 2024 Date: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने शिव मंदिरांत मोठी सजावट केली जाते. अनेक जण घरी किंवा मंदिरात रुद्राभिषेक आणि शिव उपासना करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री उत्सव दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे. शिवपुराणानुसार या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. याचबरोबर त्यांनी संन्यासाचे जीवन सोडून गृहस्थाचे जीवन सुरू केले अशी आख्यायिका सांगितली जाते. यामुळे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीची सर्व संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. यंदाच्या वर्षात महाशिवरात्री कधी आहे, याची तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा