Mangal Gochar In Kanya: ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ज्याचा परिणाम थेट मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. तसेच ग्रहांचे हे गोचर काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते. अशातच आता मंगळ ग्रह ऑगस्टमध्ये कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि बुध यांच्यात शत्रुत्वाचा भाव आहे. तरीही मंगळ ग्रह राशी परिवर्तन करताच ३ राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रगतीची होण्याची शक्यता आहे. तर या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर शुभ सिद्ध होऊ शकते. कारण मंगळ तुमच्या राशीतून धनाच्या स्थानी गोचर करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. शिवाय तुम्हाला आर्थिक लाभाच्या शुभ संधी मिळू शकतात, तसेच तुम्ही नवीन व्यवसायदेखील सुरु करु शकता. तुमचे अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या बोलण्यातही प्रभाव दिसेल ज्यामुळे लोक प्रभावित होऊ शकतात.

धनु रास (Dhanu Zodiac)

मंगळाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण मंगळ ग्रह तुमच्या कुंडलीच्या कार्यक्षेत्रात गोचर करणार आहे. म्हणूनच यावेळी तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकते. तर नोकरदारांचा या काळात प्रभाव दिसून येऊ शकतो, त्यांना करिअरमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी मंगळाचे गोचर चांगले ठरु शकते, या काळात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. तर जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरीही मिळू शकते.

मीन रास (Meen Zodiac)

हेही वाचा- १६ जुलैपासून ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बुधादित्य राजयोग बनताच प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

मंगळ तुमच्या राशीतून सातव्या स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची साथ मिळू शकते. त्यांच्या सहकार्याने तुम्हाला पैसा मिळू शकतो. यासोबतच मीन राशीचा स्वामी गुरू आहे आणि मंगळाचा गुरुशी मैत्रीचा भाव आहे. त्यामुळे तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. तसेच, या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. दुसरीकडे राजकारणाशी संबंधित असलेल्यांना काही पद मिळण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)