आंबा हा फळांचा राजा मानला जातो. हिंदू धर्मात शुभकार्याप्रसंगी आंब्याच्या पानाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. सजावटीसाठी आंब्याची पाने घराच्या दरवाज्याला लावली जातात. आंब्याची पाने पूजेदरम्यान वापरली जातात. कोणतंही शुभकार्य आंब्याच्या पानांची डहाळी लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. आपल्याकडे शुभकार्यात घराला तोरण लावताना आंब्याची पाने किंवा डहाळी लावण्याची प्रथा आहे. फक्त दरवाज्यावरच आंब्याची पाने लावत नसून पूजेदरम्यान कलशाच्या बाजूनेही पाने लावली जातात. पण पूजा-शुभ कार्यात आंब्याची पानंच का वापरली जातात? यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का…? चला तर मग आज आपण जाणून घेऊया…

पूजेमध्ये आंब्याची पाने महत्त्वाची का असतात?

सनातन धर्म ग्रंथानुसार, आंब्याचे झाड मेष राशीचे प्रतीक मानले जाते. अशी मान्यता आहे की, राशी मेष असल्यामुळे आंब्याचे झाड सर्वात शुभ असते. ज्या घराजवळ आंब्याचे झाड लावले जाते त्या घरावर देवी-देवतांची कृपा असते, असं मानलं जातं. यामुळेच आंब्याच्या पानांचा वापर घर, दुकान किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यात केला जातो. घराच्या, दुकानाच्या दारावर हार घालायचा असो किंवा पूजेत वापरायचा असो, आंब्याची पाने नेहमी मागवली जातात. त्याचप्रमाणे धार्मिक मान्यतेनुसार, आंबा हा हनुमान यांचे आवडते फळ आहे. त्यामुळे जिथेही आंबा आणि आंब्याची पान असतात तिथे हनुमानची कृपा असते, असेही मानले जाते.

(हे ही वाचा: आरती, भजन, किर्तन सुwww.loksatta.com/do-you-know/do-you-know-why-clap-is-played-in-bhajan-kirtan-what-is-its-how-did-clapping-start-pdb-95-3931475/रू असताना लोकं टाळ्या का वाजवतात? कोणी सुरू केली प्रथा? जाणून घ्या यामागचं रहस्य )

तसेच, घरी होणाऱ्या हवन-यज्ञात आंब्याच्या लाकडाचा उपयोग नेहमी केला जातो. या लाकडाचा वापर हवन करताना केल्यास वातावरणात सकारत्मकता वाढते. बाहेरून येणारी हवा जेव्हाही पानांना स्पर्श करते तेव्हा सकारत्मकता घरात प्रवेश करते, असेही म्हटले जाते. एवढंच नव्हे, तर आंब्याच्या पानांचे अनेक औषधी उपयोगही आहेत.

सर्व प्रमुख सण आणि शुभ प्रसंगी घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांपासून बनविलेले तोरण बनवण्याची सनातन धर्माची परंपरा आहे. असे मानले जाते की, असे केल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)