Mercury transit in Aquarius set in 2023: नऊ ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध शनीच्या मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. मार्च महिन्यात बुध दोनदा रास बदलेल. मार्च महिन्यात बुध कुंभ राशीतून गुरूच्या मीन राशीत जाईल. या महिन्याच्या शेवटी बुध मेष राशीत प्रवेश करेल, ज्याचा स्वामी मंगळ आहे.

विशेष म्हणजे कुंभ राशीत प्रवेश केल्यावरच बुध अस्त होईल. सध्या सूर्य आणि शनि कुंभ राशीत आहेत. सूर्य आणि बुध एकमेकांच्या जवळ असल्याने सूर्याच्या प्रभावाखाली बुध गायब होईल. याला बुध ग्रह वक्री होणे म्हणतात. साधारण महिनाभर बुध अस्त राहील.

विशेष बाब म्हणजे सध्या शनिही कुंभ राशीत भ्रमण करत आहे. कुंभ राशीत बुध ग्रहाच्या प्रवेशाचा तुमच्यावर काय परिणाम होईल, कोणकोणत्या राशीच्या लोकांना धनसंपत्ती, आर्थिक प्रगती, आगामी काळात यश मिळू शकते जाणून घेऊया..

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला राहील. मेहनतीचे फळ मिळते. प्रेम जीवन थोडे तणावपूर्ण असू शकते. याकाळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. ज्यामुळे तुमची आर्थिक स्तिथी सुधारू शकते.

( हे ही वाचा: येत्या १० महिन्यात ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ? लक्ष्मीच्या कृपेने तुम्हीही होऊ शकता श्रीमंत)

वृषभ राशी

कुंभ राशीत बुधाचा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. नोकरीत स्थिरता येऊ शकते. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा चांगली राहील. तसच याकाळात तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. मार्च महिना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगला राहील.

सिंह राशी

कुंभ राशीत बुधाचा प्रवेश सिंह राशीसाठी अनुकूल ठरू शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही करू शकता. कुटुंबात काही मतभेद होऊ शकतात. तणावही आयुष्यात थोडा वाढू शकतो. वाणीवर संयम ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)