Mercury Uday in Libra 2025: ग्रहांच्या हालचालींना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व दिलं जातं. त्यातही ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा ‘बुध’मान-सन्मान, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि संवाद कौशल्याचा कारक याच्या स्थितीतील बदलाला जीवनातील अनेक घडामोडींचा सूचक मानलं जातं. द्रिक पंचांगाच्या माहितीनुसार, बुध २७ नोव्हेंबर २०२५ रोजी तूळ राशीत उदित होणार आहेत. विशेष म्हणजे, १२ नोव्हेंबरला बुध वृश्चिकेत अस्त झाले होते आणि तब्बल १५ दिवसांनंतर २७ नोव्हेंबरला पुन्हा उदयास येणार आहेत. दरम्यान, २३ नोव्हेंबरला बुध तूळ राशीत गोचरही करणार आहेत, त्यामुळे बुधाचा उदय हा तूळ राशीतूनच चिन्हांकित होणार आहे.
ज्योतिषीय विश्लेषणानुसार हा बदल काही राशींसाठी अनुकूल संधी, सकारात्मक घडामोडी आणि नशीब सोबत देणारा काळ घेऊन येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते, त्यामुळे तीन राशींना विशेष लाभदायी संकेत प्राप्त होऊ शकतात. कोणत्या आहेत त्या राशी पाहूयात…
१. वृषभ – निर्णयशक्ती तेजित, करिअरला ‘नवीन गती’ मिळण्याची शक्यता
२७ नोव्हेंबरला बुध उदयास आल्यानंतर वृषभ राशीच्या लोकांसाठी अडकलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता ज्योतिषीय विश्लेषणात मांडली जाते. संवाद कौशल्यात सहजता येईल, त्यामुळे ऑफिसमधील अडथळे कमी होऊ शकतात. मार्केटिंग, पब्लिक रिलेशन, मीडिया किंवा लोकांशी संवादावर आधारित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ होण्याचे संकेत आहेत. मोठा धनलाभ होऊ शकतो. मानसिक ताण कमी होऊन विचारांमध्ये स्पष्टता वाढेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा ताळमेळ राखणे सोपे जाऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
२. कर्क – योजनांचे ‘परफेक्ट टाइमिंग’? कामात यशस्वी चित्राची शक्यता
बुध उदयाचा कर्क राशीवरचा प्रभाव वरदानासारखा मानला जातो, असे ज्योतिषशास्त्रात वर्णन आहे. जे प्लॅन्स आधी वारंवार बदलायची वेळ यायची, ते आता अचूकपणे जुळून येण्याची शक्यता दिसते. कामाच्या पद्धतीत शिस्त आणि वेग दोन्ही येऊ शकतात. करिअरमध्ये प्रमोशन, नवी जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून पाठिंबा मिळण्याचे संकेत दिसतात. आर्थिक बाबतीतही दिलासा मिळण्याची शक्यता असून खर्चांवर नियंत्रण आणता येऊ शकते. एकूणच, कर्क राशीसाठी हा काळ उत्पादनक्षम आणि प्रगतीकडे नेणारा राहू शकतो.
३. धनू – आर्थिक निर्णयात लाभ? विद्यार्थ्यांसाठीही शुभ संकेत
धनू राशीसाठी बुधाचा उदय हा सकारात्मक आणि संधींनी भरलेला कालावधी दर्शवतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते.
पैशाचे व्यवहार, गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेताना योग्य दिशेने पावले पडू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला मानला जातो. कामगिरी सुधारण्याचे संकेत, विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष केंद्रित होऊ शकते.
कौटुंबिक गैरसमज दूर होत नात्यात समजुतदारी वाढू शकते. व्यावसायिकांसाठीही काही नवे करार, वाढता नफा किंवा नवीन संधींचे संकेत दिसू शकतात.
२७ नोव्हेंबरला होणारा बुध उदय हा ज्योतिषीय दृष्टिकोनातून ऊर्जेतील बदल, निर्णयशक्तीतील सुधारणा आणि नशिबाच्या गतीतील चढ-उतार दर्शवू शकतो. वरील तिन्ही राशींना या काळात काही सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता मांडली जाते. तथापि, हे सर्व ज्योतिषशास्त्रीय शक्यतांवर आधारित आहे, निश्चित परिणाम वेगवेगळ्या व्यक्तींच्या पत्रिकेनुसार बदलू शकतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
