Numerology Angel Number Meaning आपल्या जीवनात संख्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. हे आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करतात कारण ते थेट ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीशी संबंधित आहेत. जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचे असते तेव्हा राशिचक्र पाहिले जाते, परंतु हे सर्व जन्मतारीख द्वारे देखील ओळखले जाऊ शकते. अंकशास्त्र ज्योतिष हे एक शास्त्र आहे जे आपल्याला नंबरद्वारे आपल्या जीवनाबद्दल सांगण्यास मदत करते.
अनेक वेळा असे घडते की आपण आपल्या आजूबाजूला काही नंबर पुन्हा पुन्हा पाहतो. तो नंबर आपण आपल्या मोबाईलमध्ये, नेमप्लेटवर, वाहनाच्या नंबर प्लेटवर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पाहिला असला तरी तो पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येतो. असाच तोच नंबर पुन्हा पुन्हा दिसणे खूप काही सांगून जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका एंजल नंबरबद्दल सांगणार आहोत, ज्याचा उल्लेख अंक शास्त्रात केला आहे.
एंजल नंबर काय आहे?
एंजल नंबरला Goding Number म्हणून देखील कॉल करू शकतो. हे आकडे आपल्याला स्वतःबद्दल सांगतात. एंजल नंबर आपले मार्गदर्शन देखील करतात, एंजल नंबरमध्ये जी काही संख्या दिसते ती आपल्याला स्वत:बद्दल सांगते. एंजल नंबर अगदी सहज काढता येतात. तुम्ही तुमच्या जन्मतारखेच्या आधारे त्याची गणना करू शकता.
हेही वाचा – छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
कसा शोधावा एंजल नंबर?
जर तुमची जन्मतारीख २५-०५-१९८५ असेल. त्यामुळे तुम्हाला हे सर्व आकडे जोडावे लागतील. २+५+०+५+१+९+८+५=३५. ३+४=८ या दोन नंबरला एका नबंर रूपांतरित करा. जर तुमचा क्रमांक ११, २२, ३३ असेल तर तो अंकशास्त्रात मास्टर नंबर मानला जातो.
जर तुमची एंजल नंबर ८ असेल तर ती शक्ती आणि यश दर्शवते. जर तुमचा अंक ११ असेल तर तो तुम्हाला धर्म आणि अध्यात्माकडे घेऊन जातो.
तुम्ही एंजल नंबर कुठे पाहू शकता. जसे की तुमच्या वाहन परवान्यावर, तुमच्या वाहन क्रमांकावर, तुमच्या फोन नंबरवर. एंजल नंबरमधून मिळणारा संकेच स्विकारून आपण स्वतःला उच्च उर्जेशी जोडू शकतो आणि प्रगती करू शकता
हेही वाचा – Numerology: मरेपर्यंत आपला शब्द पाळतात ‘या’ जन्मतिथीचे लोक! नेहमी दुसऱ्यांना मदत करतात
एंजल नंब ११११अर्थ आपल्या विचार आणि इच्छांकडे लक्ष देण्यास नेहमी तयार असतो. ही संख्या तुम्हाला तुमच्या विचारांवर आणि हेतूंवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते.
(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)