ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करून तिच्या भविष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेता येतात. त्याचप्रकारे व्यक्तीचा जन्म दिवस आणि जन्म तारखेवरून तिचा स्वभाव आणि व्यक्तित्त्वाविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्यास मदत मिळते. आजपासून नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली असून या महिन्यात जन्माला येणाऱ्या लोकांमध्ये असे काही गुण आहेत जे इतरांपेक्षा काही प्रमाणात वेगळे असतात. अंक शास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्तींमध्ये कोणते खास गुण असतात याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तसेच, या महिन्यात जन्माला येणाऱ्या व्यक्तींचा भाग्यदायी क्रमांक आणि रंग कोणता आहे ते पाहुयात.
- कल्पक विचार
अंक शास्त्रानुसार नोव्हेंबरमध्ये जन्माला आलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावशाली असते. त्याचबरोबर हे लोक खूपच दूरदर्शी असतात. आपले म्हणणे स्पष्टपणे मांडण्यात ते समर्थ असतात. या लोकांना आपल्या मेहनतीवर खूप विश्वास असतो. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक धार्मिक असल्याने ते त्यांची देवावर श्रद्धा असते. कल्पक विचार करत असल्याने कोणत्याही परिस्थितीत ते हार मानत नाहीत.
Jupiter Transit : दिवाळीनंतर सुरु होणार ‘या’ राशींचे अच्छे दिन! गुरुदेवाचा आशीर्वाद ठरणार लाभदायक
- बिनधास्त
अंक शास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले लोक बिनधास्त असतात. त्यांना खोटं बोलणारे लोक आवडत नाही. तसेच, कोणासमोर झुकणे त्यांना पसंत नाही. या लोकांवर मंगळाचा प्रभाव असल्याने ते व्यवसायामध्ये जोखीम घेण्यास सक्षम असतात. त्यांच्या याच गुणामुळे ते स्वतःचा आर्थिक फायदा करून घेऊ शकतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवू शकतात. हे लोक कामाच्या ठिकाणीही आपली वेगळी ओळख निर्माण करतात. हे लोक नेहमी व्यावहारिक विचार करतात.
११ नोव्हेंबरनंतर बदलू शकतात ‘या’ सहा राशींचे दिवस; शुक्रदेवाच्या संक्रमणामुळे धनलाभाचे प्रबळ योग
भाग्यवान क्रमांक आणि रंग
नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक पोलिस, आर्मी, मीडिया, लेखक आणि गुप्तचर विभागात चांगले नाव कमवू शकतात. अंक शास्त्रानुसार १, ३ आणि ७ हे या लोकांचे भाग्यवान क्रमांक आहेत, तर गुलाबी, पांढरा आणि तपकिरी हे भाग्यवान रंग आहेत. गुरुवार आणि मंगळवार हे दिवस या लोकांसाठी शुभ असू शकतात.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)