Numerology: ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या प्रकारे कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज वर्तवला जातो, त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्माच्या तारखेवरून त्या व्यक्तीचे भविष्य, गुणांचे वर्णन केले जाते. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेचा एकांक हा मूलांक असतो. म्हणजेच समजा- जर एखादी व्यक्ती कोणत्याही महिन्यातील ९, १८, २७ या तारखेला जन्मली असेल, तर त्या व्यक्तीचा मूलांक १ + ८ = ९, २ + ७ = ९ असतो. अशा प्रकारे १ ते ९ हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो, तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आज आम्ही तुम्हाला अशा मूलांकाच्या लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. त्याशिवाय हे लोक न्यायप्रिय आणि शिस्तप्रियदेखील असतात. ८ हा मूलांक (जन्मतारीख ८, १७, २६) शनीचा असल्याने या मूलांकाच्या लोकांमध्ये हे गुण पाहायला मिळतात. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मूलांकदेखील ८ आहे. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर रोजी झाला होता.

८ मूलांकाचे लोक कसे असतात?

८ या अंकावर शनी ग्रहाचा अंमल असतो. हा शनीचा अंक असल्याने संख्याशास्त्रात ८‌ या अंकाकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. पण, खरं तर हा मोठा गैरसमज आहे. कारण- १ ते ९ या मूलांकात कोणताच अंक हा शुभ वा अशुभ नसतो. उत्तम आत्मविश्वास, शूर व हाताखालील लोकांवर उत्तम नियंत्रण, अशी ८ हा मूलांक असणाऱ्यांची ओळख असते. त्याशिवाय राजकारण, बँक, कायदे, शिक्षण या क्षेत्रांतही हे लोक उच्च पद गाठतात.

नेतृत्वाची क्षमता

या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता खूप चांगली असते. शनिदेवाची त्यांच्यावर विशेष कृपा असते. हे लोक कधी काय करतील याचा अंदाज कोणीही करू शकत नाही. हे खूप मेहनती व प्रामाणिक असतात. या मूलांकाचे लोक भौतिक आणि आध्यत्मिक गोष्टींमध्ये योग्य संतुलन ठेवणे पसंत करतात. या व्यक्ती साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा गोष्टींचे पालन करतात. तसेच या व्यक्ती नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात.

८ मूलांकाच्या लोकांसाठी असे मित्र फायदेशीर

८ मूलांक असणाऱ्या व्यक्तींना विशेषतः ३ व ६ हे मूलांक असणाऱ्या व्यक्ती साह्यभूत ठरतात. कारण- ते ८ कडे आपला विश्वासू मित्र म्हणून पाहतात. त्यामुळे उद्योगधंद्यात ३ व ६ हे मूलांक असणाऱ्या व्यक्तींशी केलेली भागीदारी खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी ठरते. तसेच प्रेमसंबंधातही ८ मूलांकाच्या व्यक्तीला ३ व ६ या मूलांकाच्या व्यक्ती खऱ्या अर्थाने समजून घेतील. तसेच अशा व्यक्तींशी केलेले विवाह सुखदायक ठरले आहेत.