Kartik Purnima 2023 : हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. यंदा २७ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा साजरी होणार आहे. या शुभ दिवशी पहाटे ५ वाजून ४१ मिनिटांनी बुध ग्रह धनु राशीत प्रवेश करणार असून २८ डिसेंबरपर्यंत तो त्याच राशीत राहणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शिवयोग, सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्र यांचाही शुभ योग होत आहे. त्यामुळे मेष आणि मिथुनसह ५ राशींचे भाग्य उजळणार आहे. कार्तिक पौर्णिमेला बुध गोचरच्या शुभ प्रभावामुळे काही राशींना नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना अपार यश मिळू शकते. तसेच त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ज्यांच्यावर २७ नोव्हेंबरपासून लक्ष्मीची कृपा राहणार आहे ते जाणून घेऊया.
मेष रास
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींचा समाजात मान-सन्मान वाढू शकतो.धार्मिक कार्यात रुची राहू शकते. तसेच या काळात व्यावसायिक जीवनात प्रगती होण्याची शक्यता आहे. घरात सुख-शांती नांदू शकते.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना मुलांकडून आनंद मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळू शकते. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. या काळात तुमची व्यवसायात प्रगती होऊ शकते
सिंह रास
२७ नोव्हेंबरपासून सिंह राशीच्या लोकांना नशीब साथ मिळू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या शत्रूंचा पराभव होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळण्याचीही शक्यता आहे. करिअरमध्ये यश मिळवू शकता.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊ शकतात. मागील गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कठोर परिश्रम आणि समर्पणाने सर्व कामे यशस्वी होऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)