वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला छाया ग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. राहु ग्रहामध्ये व्यक्तीला राजाचा रंक आणि रंकाचा राजा करण्याची शक्ती आहे, असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रात राहू ग्रहाला मायावी ग्रह असेही म्हणतात. त्याचबरोबर राहू हा ग्रह विदेश प्रवास, महामारी, राजकारणाचा कारकही मानला जातो. जर कुंडलीत राहू ग्रहाची स्थिती सकारात्मक असेल तर व्यक्ती यशाची उंच शिखरं गाठतो. राहू ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे दीड वर्षे लागतात. १७ मार्च रोजी राहू ग्रह मेष राशित प्रवेश करणार आहे. राहुचे संक्रमण चार राशिच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे, चला जाणून घेऊयात या चार राशी कोणत्या आहेत.

मिथुन: हा राशी बदल या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या सकारात्मक राहील. तुम्हाला अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध व्यवसायाचा दाता आहे. त्यामुळे या काळात व्यवसायात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमची वेतनवाढ अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्यास यावेळी होऊ शकते. जर तुम्ही राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित असाल तर या काळात तुम्हाला मोठे पद मिळू शकते. जे लोक मीडिया किंवा टीव्हीशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठीही हे संक्रमण शुभ ठरेल.

कर्क: राहू ग्रहाचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरेल. कर्क राशिवर चंद्र देवाचे राज्य आहे. म्हणून, यावेळी आपण व्यवसायात भरपूर पैसे कमवाल. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. या काळात तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तो सुरू करू शकता. कुंडलीच्या पाचव्या, दहाव्या आणि अकराव्या घरात जेव्हा जेव्हा एखादा ग्रह भ्रमण करतो तेव्हा करिअर आणि नवीन नोकरीत बदल होतो. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरेल. नोकरीतील बदलामुळे पगारात चांगली वाढ अपेक्षित आहे.

Astrology 2022: मंगळ ग्रहाच्या राशि परिवर्तनामुळे चार राशींवर होणार कृपा; तुमची रास आहे का वाचा

वृश्चिक: राहू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. नवीन वर्षात तुम्ही पैसे कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक राशीवर मंगळ ग्रहाचे राज्य आहे. त्यामुळे या काळात लष्कर, इंजिनीअर, पोलीस, मेडिकल या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. या कालावधीत तुम्हाला शेअर आणि सट्टा व्यापारातही फायदा होऊ शकतो. राजकारणात केलेले प्रयत्न यशस्वी होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ: राहूच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जे लोक शनिशी संबंधित काम जसे तेल, लोखंडाचे काम करत आहेत, त्यांच्यासाठी गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. तुम्ही संपत्ती जमा करू शकाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना हवी ती नोकरी मिळू शकते. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
तुम्ही राजकारणात अनेक दिवसांपासून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे, यावेळी तुम्हाला मोठे पद मिळू शकते.