ज्योतिषशास्त्रात राशींची संख्या १२ असून ९ ग्रह आणि २७ नक्षत्र आहेत. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा मानवी जीवनावरही परिणाम होतो. काहींसाठी हा बदल शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांची स्थिती, घरे, नक्षत्र, राशी अनेक प्रकारचे परिणाम देतात. या सर्वांचा एक ना एक प्रकारे व्यक्तीवर परिणाम होत असतो. व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांमध्ये, ग्रहांची स्थिती आणि दशा यांच्यातील संबंध दर्शवितात. गोचर म्हणजे हालचाल करणे. गो म्हणजे नक्षत्र किंवा ग्रह आणि चर म्हणजे चालणे.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूर्यापासून राहू केतूपर्यंत सर्व ग्रहांची स्वतःची गती आहे. आपापल्या गतीनुसार सर्व ग्रहांना राशीमध्ये फिरण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. एप्रिल महिन्यात सर्वच ग्रहांनी राशी बदल केला आहे. त्यात शनि, राहु, केतु आणि गुरु ग्रह सर्वाधिक काळ राशीत असणार आहेत. शनि आता कुंभ राशीत असून अडीच वर्षानंतर रास बदलतील. तर राहु मेष राशीत, तर केतु तूळ राशीत असून दीड वर्षानंतर रास बदलणार आहे. तर गुरु ग्रह सध्या मीन राशीत असून एका वर्षानंतर रास बदलणार आहे. पण सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्र हे ग्रह मात्र मे महिन्यात रास बदलणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे २०२२

ग्रहराशी
सूर्यमहिन्याच्या सुरुवातीला मेष राशीत, १५ मे पासून वृषभ राशीत
मंगळमहिन्याच्या सुरुवातील कुंभ राशीत, १७ मे पासून मीन राशीत
बुधमहिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत, ११ मे पासून वक्री
गुरुमीन राशीत
शुक्रमहिन्याच्या सुरुवातीला मीन राशीत, २३ मे पासून मेष राशीत
शनिकुंभ राशीत
राहुमेष राशीत
केतुतूळ राशीत
चंद्रप्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार