समुद्र ऋषी यांनी सामुद्रिक शास्त्रात शरीराच्या अवयवांची रचना आणि त्यावरील खुणा याचा व्यक्तीचा स्वभाव व व्यक्तिमत्त्वावर कसा परिणाम होतो, याबद्दल सांगितलं आहे. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांप्रमाणे नखांच्या तिळांवरून माणसाचा स्वभाव आणि वर्तणूक कळू शकते, असं म्हटलं जातं. नखांवरील तीळ व्यक्तीबद्दल अनेक रहस्ये सांगतात, असं मानलं जातं.

तर्जनीवर तीळ

तर्जनीच्या नखावर तीळ असलेली व्यक्ती भावूक असते, असं म्हटलं जातं. अशा लोकांच्या भावनिकतेचा लोक फायदा घेतात आणि त्यांच्याकडून काम काढून घेतात. अशा लोकांनी जास्त मित्र बनवू नये. कारण त्यांच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते.

अंगठ्याच्या नखावर तीळ

ज्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या नखावर तीळ असतो, ती व्यक्ती खूप प्रभावशाली असते, असं म्हटलं जातं. असे लोक जिथे जातात तिथे लोकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात. असे लोक भविष्यात नेते म्हणून काम करतात, असंही म्हटलं जातं.

मधल्या बोटाच्या नखावर तीळ

मधल्या बोटाच्या नखावर तीळ असलेली व्यक्ती बुद्धिमान असते. पण असे लोक शारीरिकदृष्ट्या कमकुवत असतात. हे लोक खूप नखरे करतात. छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांचा राग येतो. त्यांचे खूप सारे मित्र असतात, असं म्हणतात.

अनामिकेच्या नखावर तीळ

सामुद्रिक शास्त्रात असे मानले जाते की अनामिकेच्या नखावर तीळ असलेले लोक प्रसन्न असतात. तसेच ते खूप हुशार असतात, त्यांना कोणत्याही परिस्थितीची जाणीव लवकर होते.

करंगळीच्या नखावर तीळ

ज्या लोकांच्या करंगळीच्या नखेवर तीळ असतो ते स्वभावाने खूप चंचल असतात. या लोकांचं मन कुठेही रमत नाही, अशा लोकांना खूप मित्र असतात; असं म्हटलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.