Shani Rashi Parivartan 2022: ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आणि ९ ग्रहांचा अभ्यास केला जातो. सर्व ९ ग्रहांमध्ये शनि हा ग्रह सर्वात महत्वाचा मानला जातो. कारण शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. या ९ ग्रहांमध्ये शनि सर्वात मंद गतीने चालतो, त्यामुळे त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. जेव्हा शनि राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो.

३० वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश : शनि ग्रह सध्या स्वतःच्या राशीत मकर राशीत बसला आहे. २९ एप्रिल २०२२ रोजी शनी ३० वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. शनि हा देखील या राशीचा अधिपती ग्रह आहे. यामुळे कुंभ राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असते.

कुंभ राशीत शनीच्या प्रवेशाने कुंभ, मीन आणि मकर राशीला साडे सातीचा दुसरा, पहिला आणि तिसरा चरण सुरू होईल. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर धैय्या सुरू होईल. शनीची बदल आणि प्रतिगामी अवस्था लक्षात घेऊन सन २०२२ मध्ये मकर, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर वक्र नजर असेल.

आणखी वाचा : ३१ मार्चपर्यंतचा काळ ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरणार आनंददायी; मिळेल भरपूर पैसा आणि सुख

या राशींसाठी शनिचे संक्रमण होईल शुभ : मेष, तूळ, वृषभ आणि धनु राशीच्या लोकांना शनिच्या संक्रमणामुळे शुभ परिणाम मिळतील. या दरम्यान या राशीच्या धनाशी संबंधित समस्या दूर होतील आणि उत्पन्न वाढेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभ आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचाही पूर्ण पाठिंबा मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साडेसाती आणि धैय्या म्हणजे काय: ज्योतिषांच्या मते, व्यक्तीच्या आयुष्यात तीन वेळा साडेसाती नक्कीच येते. पहिल्या चरणात शनि व्यक्तीच्या मुखावर आणि दुसऱ्या चरणात उदर म्हणजे पोटावर वास करतो. तसंच तिसऱ्या चरणात शनि चरणी येतो. हा क्रम साडेसात वर्षापर्यंत चालू राहतो. म्हणजे माणसाला साडेसात वर्षे शनिच्या दशेत राहावं लागतं. साडेसातीचे एकूण तीन टप्पे असून प्रत्येक टप्प्याचा कालावधी हा अडीच-अडीच वर्षांचा आहे.