Saturn Transit 2023: ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला कर्माचा न्यायकर्ता आणि दाता मानले जाते. म्हणजे शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. १७ जानेवारी रोजी शनिदेवाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि ते नवांश कुंडलीमध्ये उच्च स्थानावर आहेत. तसेच कुंभ राशीमध्ये शनि चंद्राच्या होरामध्ये विराजमान आहे. त्यामुळे ३ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्क राशी

नवांश कुंडलीतील शनिदेवाचे उच्च स्थान तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुमचे आरोग्य सुधारेल. तसेच, जर घरातील वृद्ध व्यक्ती आजारी असेल तर त्यांची प्रकृती सुधारू शकते. तसेच, यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. त्याच वेळी, तुम्हाला पैसे वाचवण्यात आणि पैसे गुंतवण्यात यश मिळेल. पण यावेळी काही मानसिक तणाव असू शकतो. कारण शनिची साडेसती सुरू आहे.

तूळ राशी

शनिदेवाच्या नवांश कुंडलीत उच्च स्थान मिळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण नवांश कुंडलीमध्ये शनिदेव उच्च स्थानावर जात आहेत. त्यामुळे मीडिया, फिल्म लाइन, फॅशन डिझायनिंग आणि लक्झरी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. तसेच, यावेळी बेरोजगारांना नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल.

( हे ही वाचा: होळीनंतर ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकणार? गुरुदेव देणार प्रचंड धनलाभाची संधी)

कुंभ राशी

नवांश कुंडलीमध्ये शनिदेवाची उच्चस्तिथी कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते . कारण शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीच्या भाग्यशाली स्थानी विराजमान आहेत. त्यामुळे यावेळी नशीब तुमच्या सोबत असेल. यासोबतच हातात अडकलेल्या कामात यश मिळू शकते. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला कुठूनतरी नवीन नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतो. तसेच, हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी अद्भूत ठरू शकतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani dev transit in kumbh rashi these zodiac sign can get huge amount of money gps
First published on: 31-01-2023 at 12:12 IST