ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. कधी उदय-अस्त होतो, तर कधी वक्री होतो. या बदलाचा परिणाम सर्वच राशींवर होतो. प्रत्येक ग्रहाचा राशी बदलाचा कालावधी ठरलेला आहे. चंद्र दर सव्वा दिवसांनी राशी बदल करतो. तर शनि अडीच वर्षानंतर राशी बदल करतो. त्यामुळे कमी अधिक कालावधीनंतर काही ग्रह एका राशीत एकत्र येतात. याला ग्रहांची युती संबोधलं जातं. कधी मित्र ग्रह एकत्र येतात, तर कधी शत्रू ग्रह एकत्र येतात. याचा परिणाम राशींवर दिसून येतो. शनि ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या राशीत मंगळ ग्रह आधीपासूनच विराजमान आहेत. त्यामुळे दोन शत्रू ग्रह कुंभ राशीत १७ मे पर्यंत एकत्र असणार आहेत. शनि-मंगळच्या या युतीला द्वंद्व योग बोललं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार हा अशुभ योग आहे. त्यामुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम जाणवणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्क: या राशीच्या आठव्या घरात शनि-मंगळाचा योग तयार होत आहे. त्यामुळे या राशींवर अपघाताचा धोका आहे. आठवं स्थान वय, धोका आणि अपघाताचे घर आहे. यासोबतच कामाच्या ठिकाणी कोणताही धोका पत्करणे टाळा आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आठव्या घरात संयोग तयार होणे हे चांगले लक्षण नाही. यावेळी काही अनुचित प्रकार घडण्याची चिन्हे आहेत.

कन्या: या राशीच्या सहाव्या घरात शनि-मंगळ एकत्र येत आहेत. म्हणजे कर्ज, शत्रू, आरोग्य, व्यवसाय आणि मेहनत या स्थानात दोन ग्रह एकत्र विराजमान झाले आहेत. या काळात लोकांना त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल, यासोबतच त्यांच्या खाण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. शनि आणि मंगळाच्या संयोगामुळे आरोग्य बिघडण्यासोबतच तुम्हाला उपचारांवर खर्च करावा लागू शकतो.

Shani Gochar 2022: आजपासून ‘या’ राशीला शनि साडेसाती सुरू, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगतं?

कुंभ: शनि-मंगळाच्या या योगामुळे कुंभ राशीच्या लोकांना जास्त काळजी घ्यावी लागेल. या काळात नकारात्मक विचारांनी घेरले जाण्याची शक्यता आहे. राग, चिडचिड, उद्धटपणा यांचा परिणाम स्वभावात दिसून येईल. वैयक्तिक जीवनासह, तुम्हाला कामात सावधगिरी बाळगावी लागेल. या काळात जोडीदार आणि सहकाऱ्याशी वाद किंवा भांडण होण्याची शक्यता जास्त असेल.

मंगळ शनि युतीवर उपाय

  • लोकांनी दर मंगळवारी बजरंगबाण पठण करावे.
  • शनि आणि मंगळाशी संबंधित वस्तूंचे दान करावे.
  • शनि आणि मंगळाच्या शांतीसाठी त्यांच्या मंत्रांचा जप फायदेशीर ठरू शकतो.
  • शनि आणि मंगळ ग्रह दोष दूर करण्यासाठी यज्ञ करणे देखील फलदायी ठरू शकते.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani mangal yuti in kumbh rashi till 17 may 2022 rmt
First published on: 29-04-2022 at 11:46 IST