Negative Effects of Shani Sade Sati: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह इतर राशींमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या राशीतील इतर ग्रहांच्या युतीने अनेक योग बनायला सुरुवात होते. याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. सर्व ग्रहांमध्ये शनिचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण शनिच्या चालीवरून कोणत्या राशीची साडेसाती सुरु होईल याविषयी माहिती मिळते. शनि हा अत्यंत कमी वेगाने संक्रमण करणारा ग्रह आहे. याच कारणामुळे शनिचा प्रभाव हा किमान अडीच ते साडेसात वर्षांपर्यंत कायम राहतो. एखाद्या राशीत जेव्हा शनी संक्रमण होते तेव्हा शनिदेव निदान अडीच वर्ष तिथे स्थिर असतात अशा प्रकारे १२ राशींचे संक्रमण पूर्ण करण्यासाठी शनिला ३० वर्षांचा काळ लागतो.
ज्योतिषीय माहितीनुसार २३ ऑक्टोबरला शनि मकर राशीत मार्गी झाले होते, मार्गी होणे याचा अर्थ शनि सरळ चाल करणे असा होतो. १२ जुलैपासून शनिदेव मकर राशीत वक्री होते. मकरच्या पुढील रास म्हणजेच कुंभ यावर ही शनिच्या मार्गक्रमणाचा प्रभाव साहजिकच दिसून येतो. ज्योतिषांच्या माहितीनुसार, जेव्हापासून शनिदेव मकर राशीत स्थिर झाले आहेत तेव्हापासून धनु, मकर व कुंभ राशीच्या व्यक्तींवर साडेसातीचा प्रभाव सुरु झाला आहे. मात्र कुंभ राशीसाठी आता शनिदेव एक सुखद वार्ता देऊ शकतात. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार कुंभ राशीतील शनिची साडेसाती ही दुसऱ्या टप्प्यात सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात कुंभ राशीला लवकरच आराम मिळू शकतो.
वैदिक ज्योतिष गणनेनुसार, शनिने यंदा २४ एप्रिल २०२२ ला कुंभ राशीत प्रवेश घेतला होता. त्यानंतर ५ जूनला शनिदेव वक्री झाले होये. १२ जुलैला शनिने मकर राशीत प्रवेश घेतला होता व त्यानंतर आता मागच्याच महिन्यात २३ ऑक्टोबरला शनिदेव मकर राशीत प्रवेश घेऊन स्थिर झाले होते. यानुसार कुंभ राशीसाठी शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. मात्र या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर पडण्याआधी कुंभ राशीच्या व्यक्तींना काही काळ समस्यां सहन कराव्या लागू शकतात.
शनिची साडे साती ‘या’ राशींसाठी ठरू शकते भाग्यशाली; ज्योतिषशास्त्र सांगतं असं नेमकं का होतं?
कोणत्या राशींमध्ये सुरु आहे शनिची साडेसाती?
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, १७ जानेवारी २०२३ ला शनि पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे शनि राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात थोड्या समस्या वाढू शकतात. सध्या मकर, कुंभ, धनु, कर्क व वृश्चिक या राशींवर कमी अधिक तीव्रतेने साडेसातीचा प्रभाव सुरु आहे. शनिच्या साडेसातीचा प्रभाव हा ३ जून २०२७ पर्यंत कायम असू शकतो.
(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)