Shani Dev Rise: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह निश्चित अंतराने उदय आणि अस्त होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि जगावर झालेला दिसून येतो. मार्चच्‍या सुरूवातीला शनिदेवाचा कुंभ राशीत उदय होईल. ज्यामुळे धन राजयोग बनेल. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा तीन राशी आहेत ज्यांना या योगाचे शुभ परिणाम मिळतील. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी..

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा उदय अनुकूल ठरू शकतो. कारण शनिदेव शश राजयोग तयार करून तुमच्या संक्रमण कुंडलीत बसले आहेत. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना यावेळी सन्मान मिळू शकतो. त्याचवेळी याकाळात तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते.दुसरीकडे, ज्यांचा व्यवसाय तेल, पेट्रोलियम, लोह आणि खनिजांशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला असेल. तसंच हे लोकं अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीत सप्तम स्थानावर शश महापुरुष राजयोग बनवत आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच पार्टनरशीपच्या कामात देखील फायदा होऊ शकतो. त्याच वेळी, नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल. यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने कोणतेही काम कराल तर तुम्हाला फायदा होईल. यासोबतच नात्यात बळ येईल.

( हे ही वाचा: ‘गजकेसरी राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? गुरू आणि चंद्रदेव देऊ शकतात अपार पैसा)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृषभ राशी

शनिदेवाचा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीतून दहाव्या स्थानात उदय होतील. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी काम आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. तसंच याकाळात कार्यालयातील वरिष्ठांशी संबंध सुधारू शकतात. दुसरीकडे, जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच जे व्यावसायिक आहेत ते या काळात व्यवसाय वाढवू शकतात.