scorecardresearch

१ मार्चपासून ‘या’ ३ राशी होणार गडगंज श्रीमंत? माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो भरपूर पैसा

मार्च महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. हा राशीबदल काही राशींसाठी फायदेशीर ठरेल, जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..

march horoscope
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मार्च महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. ग्रह नक्षत्रांच्या बदलाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. मार्च महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम १२ राशींवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांच्यासाठी हा काळ शुभ ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींना वर्षभर धनलाभ होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल..

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी मार्च महिना अत्यंत शुभ राहील. याकाळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. त्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील. तसंच याकाळात शैक्षणिक कार्यात यश मिळेल. या महिन्यात तुम्हाला अचानक धनलाभाची संधी उपलब्ध होईल. ज्यामुळे तुमची आर्थिक स्तिथी सुधारेल. कुंभ राशीसाठी एकंदरीत हा महिना शुभ ठरेल.

मीन राशी

मीन राशीसाठी येणारा मार्च महिना फायदेशीर ठरणार आहे. यावेळी सूर्यदेव आणि बुध यांचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे याकाळात तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तसंच तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तसंच याकाळात तुमचे उत्पन्न वाढेल. यासोबतच आधीपासून रखडलेली कामे यावेळी पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असेल.

( हे ही वाचा: मंगळदेव कुमार अवस्थेत करतायत भ्रमण; ‘या’ ४ राशी होणार गडगंज श्रीमंत? वर्षभर मिळू शकतो बक्कळ पैसा)

सिंह राशी

सिंह राशीसाठी मार्च महिना चांगला असेल. व्यवसाय करणाऱ्यांना यावेळी चांगला नफा होईल. याकाळात तुम्ही शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी परदेशात जाऊ शकता. तसच याकाळात तुम्हाला तुमच्या मित्राचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील. याकाळात तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 11:18 IST