scorecardresearch

Premium

यंदाची दिवाळी ‘या’ पाच राशींच्या लोकांची होणार गोड? शुक्रदेवाच्या कृपेने महिनाभर मिळू शकतो पैसाच पैसा

Shukra Gochar 2023: शुक्रदेवाचे गोचर झाल्याने काही राशींना पैसा, संपत्ती, सुख मिळण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात…

Shukra Gochar 2023
'या' राशींचे अच्छे दिन सुरु (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shukra rashi Parivartan 2023: ज्योतिषशास्त्रात, शुक्र हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. तो संपत्ती, वैभव, ऐश्वर्य, भोग याचा कारक आहे. जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असतो, तेव्हा पैसा, संपत्ती, सुख आणि सुविधा यांची कमतरता नसते. ज्यावेळी शुक्राचं गोचर होतं तेव्हा ते व्यक्तीवर विशेष प्रभाव टाकतं. आता २ ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. शुक्रदेव ३ नोव्हेंबरपर्यंतच सिंह राशीत राहतील. त्यामुळे काही राशींना पैसा, संपत्ती, सुख मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींचे नशीब पालटणार?

वृषभ राशी

या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे शुक्रदेवाची वृषभ राशींच्या लोकांवर नेहमीच कृपा असते. या राशीतील मंडळींना या काळात पद, प्रतिष्ठा, मालमत्तेच्या गुंतवणुकीतून चांगला नफा, मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. आकस्मिक धनलाभही होऊ शकतो. 

Mahashivratri 2024
३०० वर्षांनी महाशिवरात्रीला ‘शुभ योग’ जुळून आल्याने ‘या’ राशींना होणार मोठा धनलाभ? महादेवाच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत
shani dev rise in kumbh rashi will show affect on these zodiac signs
Shani Dev : शनिचा लवकरच होतोय उदय ; या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार? अमाप धनसंपत्तीसह मिळेल भरपूर यश
Mars and Venus Made Dhan Shakti Yog
५ वर्षांनी शनिदेवाच्या राशीत ‘धन-शक्ती योग’ बनल्याने ‘या’ ३ राशींचे ‘अच्छे दिन’ सुरु? वर्षभर मिळू शकतो गडगंज पैसा
Surya Rashi Parivartan 2024
उद्यापासून ‘या’ ४ राशींच्या हातात येईल चांगला पैसा? शनिदेवाच्या राशीत सूर्यदेव गोचर करताच होऊ शकतात मालामाल

(हे ही वाचा: पुढील ३० दिवसानंतर शनिदेव मार्गी होताच ‘या’ चार राशींना देणार अमाप पैसा? माता लक्ष्मीच्या कृपेने घरात नांदू शकते सुख-समृद्धी )

मिथुन राशी 

मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्रदेवाचे गोचर फायदेशीर ठरु शकते. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा मिळू शकतो, नोकरदारांना पदोन्नती व वेतनवाढ होऊ शकते. पद आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते.

कन्या राशी

कन्या राशीच्या व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम ठरु शकतो. शेअर बाजार, लॉटरी या माध्यमातून अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढही मिळू शकते. या काळात कौटुंबिक वातावरण चांगलं राहू शकतो.

(हे ही वाचा: दीड वर्षांनंतर राहू-केतूच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ पाच राशींना होणार प्रचंड धनलाभ? २०२५ पर्यंत होऊ शकतात कोट्यधीश )

धनु राशी

धनु राशीच्या मंडळींची या काळात कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत स्थिती सुधारु शकते. नशिबाची साथ मिळाल्याने व्यवसायात भरपूर नफा होऊन पैसा वाचवण्याच्या संधीही मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होऊन जोडीदारासोबत नाते घट्ट होऊ शकतात.

कुंभ राशी

कुंभ राशींच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर लाभदायी ठरु शकते. या काळात प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊन धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. अविवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shukra gochar in leo these five zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb

First published on: 05-10-2023 at 11:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×