ज्योतिषशास्त्रात ग्रह राशी बदलला महत्त्व आहे. काही ग्रह दीर्घकाळ एका राशीत असतात. तर काही काही ग्रह काही दिवसांनी रास बदलतात. चंद्र, बुध, शुक्र हे लगेच रास बदलणारे ग्रह आहेत. चंद्र सव्वा दोन दिवसांनी, बुध ग्रह १८ दिवसांनी, शुक्र २३ दिवसांनी रास बदलतो. त्यामुळे त्याची फळं त्या त्या कालावधीनुसार बदलत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. वास्तविक, शुक्र ग्रह ३१ मार्च रोजी आपल्या मित्र शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्राला विलास, संपत्ती, ऐश्वर्य आणि वैभव यांच्याशी संबंधित मानले जाते. त्यामुळे शुक्र ग्रहाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण अशा तीन राशी आहेत ज्यांचा विशेष फायदा होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्र गोचर २०२२ तिथी

  • ३१ मार्च, गुरुवार, राशी कुंभ
  • २७ एप्रिल, बुधवार, राशी मीन
  • २३ मे, सोमवार, राशी मेष
  • १८ जून, शनिवार, राशी वृषभ
  • १३ जुलै, बुधवार, राशी मिथुन
  • ७ ऑगस्ट, रविवार, राशी कर्क
  • ३१ ऑगस्ट, बुधवार, राशी सिंह
  • २४ सप्टेंबर, शनिवार, राशी कन्या
  • १८ ऑक्टोबर, मंगलवार, राशी तूळ
  • ११ नोव्हेंबर, शुक्रवार, राशी वृश्चिक
  • ५ डिसेंबर, सोमवार, राशी धनु
  • २९डिसेंबर, गुरुवार, राशी मकर

मेष: या राशीच्या लोकांसाठी ३१ मार्चपासून चांगला काळ सुरू होऊ शकतो. कारण शुक्र तुमच्या राशीतून ११ व्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला उत्पन्नाचे घर म्हणतात. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसेच शुक्र तुमच्या दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो. व्यवसायात जोडीदाराचे सहकार्य मिळू शकते. या काळात तुम्ही बिझनेस ट्रिपलाही जाऊ शकता. जे फायदेशीर ठरू शकते.

मायावी ग्रह राहु करणार मेष राशीत प्रवेश, ‘या’ राशींना मिळणार जबरदस्त आर्थिक लाभ

मकर : शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या दुस-या स्थानात प्रवेश करेल. हे स्थान धन आणि वाणीचं स्थान आहे. त्यामुळे, व्यवसायात करार निश्चित केला जाऊ शकतो. अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते या काळात मिळू शकतात. ज्यांची वेतनवाढ प्रलंबित होती त्यांना यावेळी वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. मकर राशीवर शनिदेवाचे राज्य आहे ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्रदेव यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते.

वृषभ: शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र तुमच्या दशम स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला नोकरी आणि करिअरचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात चांगला नफाही होऊ शकतो. तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. जे फायदेशीर ठरू शकते. राजकारणात सक्रिय असलेल्यांना कोणतेही पद मिळू शकते. वृषभ राशीवर शुक्राचे राज्य आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra grah gochar 2022 in kumbh rashi rmt
First published on: 16-03-2022 at 13:33 IST