Shukra Nakshatra Gochar : ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राला शुभ ग्रह मानले जाते आणि तो सुख संपत्ती, समद्धी, ऐश्वर्य आणि प्रेमाचा कारक मानला जातो. कुंडलीमध्ये त्याचे स्थान व्यक्तीच्या जीवनावर खोल परिणाम करतात. शुक्र जेव्हा मजबूत होतो तेव्हा व्यक्ती चांगले आयुष्य जगतो. कलेने परिपूर्ण होतो. या दरम्यान शुक्राचा गोचर अनेक प्रकारचे फायदे पोहचवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र जेव्हा राशी व नक्षत्र परिवर्तन करतो, तेव्हा व्यक्तीच्या करिअर आणि प्रेम जीवनावर चांगले परिणाम दिसून येतात. अशात पुन्हा शुभ ग्रह शुक्र गोचर करणार आहे. ८ जुलै २०२५ ला चंद्राच्या रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करेन. सायंकाळी ४ वाजून ३१ मिनिटांनी या नक्षत्रामध्ये परिवर्तन करून काही राशींचे नशीब पालटू शकते. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.
वृषभ राशी
वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र हा भौतिक सुख, प्रेम आणि कलेचा कारक असतो. शुक्राचे नक्षत्र परिवर्तन या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती होऊ शकते. त्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते. या लोकांना नवीन स्त्रोत मिळणार आणि अचानक धन लाभ होणार. वैवाहिक लोकांच्या वैवाहिक आयुष्यात गोडवा दिसून येईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो. शुक्र गोचरमुळे नाते मजबूत राहीन. नशीबाची साथ लाभेल.
कर्क राशी
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र भावना आणि मनाचा कारक आहे. कर्क राशीच्या लोकांना नोकरीची संधी मिळू शकते. या दरम्यान स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. या लोकांचे संवाद कौशल्य लोकांना आकर्षित करू शकते. कर्क राशीचे जे लोक नेटवर्किंग क्षेत्रात काम करत आहे त्यांना चांगली संधी मिळू शकते. विदेशात प्रवास करण्याचे योग जुळून येईल. या लोकांना लव्ह लाइफमध्ये सुद्धा याचे शुभ प्रभाव दिसून येईल. समाजामध्ये मान सन्मान वाढेल.
तुळ राशी
तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रहाच्या लोकांना कला क्षेत्रात आवड असते. शुक्र प्रेम, सौंदर्यचा स्वामी आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या लोकांना धनलाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ क्रिएटिव्ही ऊर्जेने भरलेली असेल. विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनात गोडवा आणि सहकार्य दिसून येईल. नवीन लोकांद्वारे भविष्यात आर्थिक आणि करिअरशी संबंधित मोठे प्लॅन बनवू शकता. नवीन नात्यामध्ये प्रवेश करू शकता. या दरम्यान घर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी जवळच्या लोकांकडून सुख आणि सहकार्य लाभेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)