Vastu Tips For Home : वास्तुशास्त्रानुसार, घराची प्रत्येक दिशा हे ऊर्जेचे केंद्र असते आणि त्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. अनेकदा नकळत घराच्या काही कोपऱ्यांमध्ये रद्दी, नको असलेलं सामान किंवा टाकाऊ वस्तू ठेवत असतो. पण त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार, घरात कोणत्या दिशेने रद्दी किंवा जड वस्तू ठेवू नयेत याविषयी जाणून घेऊ…

वास्तुशास्त्रात, ईशान्य दिशा सर्वांत सकारात्मक आणि ऊर्जावान मानली जाते. ही दिशा ज्ञान, शांती व समृद्धीचे प्रतीक आहे. ईशान्य दिशा भगवान शिव आणि जल तत्त्वाशी संबंधित आहे. या दिशेने कचरा, टाकाऊ वस्तू किंवा घाण ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. घरात तणाव आणि अडथळे येऊ शकतात.

ईशान्य कोपऱ्यात जुन्या वस्तू, तुटलेले फर्निचर किंवा निरुपयोगी वस्तू, रद्दी ठेवणे हे वास्तुदोषाचे एक प्रमुख कारण आहे. ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि घरात अशांतता निर्माण करते. रद्दीने भरलेल्या या जागेचा कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक शांती आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. ही दिशा नेहमी स्वच्छ आणि मोकळी ठेवावी, जेणेकरून सकारात्मक उर्जेचा प्रवाह चालू राहील.

वास्तुशास्त्रानुसार, शेल्फ, जड मशीन किंवा मोठे फर्निचर यांसारख्या टाकाऊ वस्तू ईशान्य दिशेला ठेवणे अशुभ आहे. ही दिशा मोकळी असावी. फक्त सजावटीच्या आणि हलक्या वस्तूंसाठी या कोपऱ्याचा वापर करा.

ईशान्य कोपऱ्यात शौचालय किंवा बाथरूम असणे हा सर्वांत मोठा वास्तुदोष मानला जातो. ही दिशा जल तत्त्वाशी संबंधित आहे आणि येथे घाण किंवा नकारात्मक ऊर्जा साचल्याने सकारात्मकता नष्ट होते. जर तुमच्या घरात या दिशेने शौचालय असेल तर त्याचा कुटुंबाच्या आरोग्यावर आणि समृद्धीवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ आणि शुद्ध ठेवा.

ईशान्य दिशेला स्वयंपाकघर बांधल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. स्वयंपाकघर अग्नी तत्त्वाशी संबंधित आहे, तर ईशान्य कोपरा जल तत्त्वाचे प्रतीक आहे. या दोन घटकांच्या संघर्षामुळे घरात तणाव आणि आरोग्य समस्या निर्माण होतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवली पाहिजे. या कोपऱ्यात घाण, जसे की धूळ, कोळ्याचे जाळे किंवा कचरा साठून राहिल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही दिशा देवपूजा, ध्यान स्थळ किंवा लहान सजावटीची रोपं ठेवण्यासाठी उत्तम आहे. असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. तसेच, वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो.