हिंदू धर्मात अनेक गोष्टी तिथीप्रमाणे केल्या जातात. या तिथी आणि दिवसांना आपल्या धर्मात विशेष महत्त्व असते. १० सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरु झाला असून तो २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. अशी मान्यता आहे की पितृपक्षाच्या काळात पूर्वज पृथ्वीवर आपल्या वंशजांसह राहतात. अशावेळी त्यांच्यासाठी पिंडदान केले जाते. वेगवेगळे ग्रह आणि आणि नक्षत्र यांचे परिवर्तन काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ सिद्ध होते. ज्योतिष शास्त्रानुसार हे पितृ पक्ष काही राशींसाठी खूप खास असणार आहेत. याकाळात त्यांना देवी लक्ष्मीसह आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळू शकतो. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
- मेष
या काळात मेष राशीच्या लोकांचा तणाव कमी होईल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ त्यांच्यासाठी अनुकूल आहे. पितृ पक्षात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. यावेळी गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे.
Numerology: खूपच नशीबवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक; कुटुंबासाठीही ठरतात अत्यंत भाग्यवान
- मिथुन
या राशीच्या लोकांसाठी हे १६ दिवस खूप खास आहेत. या काळात उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. त्याच वेळी, उत्पन्नाचे अनेक नवीन स्त्रोत आर्थिक स्थिती सुधारू शकतात. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांचे प्रेम आणि पाठिंबा मिळेल.
- कर्क
या राशीच्या लोकांसाठी या काळात प्रवासाचे योग आहेत. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही वेळ शुभ आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे चांगले. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. त्याच वेळी, अविवाहित तरुणांसाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
- कन्या
विवाहयोग्य तरुण-तरुणींसाठी हा काळ शुभ आहे. या काळात विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच, आरोग्य चांगले राहील.
- धनु
ज्योतिष शास्त्रानुसार पितृ पक्षाचा काळ धनु राशीच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि भविष्यात नवीन पदांच्या प्राप्तीसाठी अनुकूल आहे. जर तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ आहे. तब्येतीची काळजी घ्या.
- कुंभ
या राशीच्या लोकांना या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)