Uddhav Thackeray Wheel Of Fortune: निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे गेलं आहे. ठाकरे गटाला मशाल या चिन्हावरच पुढील निवडणुका लढवाव्या लागतील असं चित्र दिसत आहे. ठाकरे गटाने आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या टॅरो कार्ड्सवरून त्यांच्या भविष्याबाबत टॅरो कार्ड रीडर जयंती अलूरकर यांनी खास सविस्तर विश्लेषण केले आहे. उद्धव ठाकरेंच्या भाग्यरेषेचं वर्णन करणाऱ्या व्हील ऑफ फॉर्च्युननुसार येत्या काळात त्यांना नेमकी काय व कशी तयारी करावी लागणार आहे हे अलुरकर यांनी सांगितले आहे. ठाकरेंच्या भविष्याच्या चक्राचा वेग महाराष्ट्राच्या राजकारणात नेमका काय बदल घडवणार याचा अंदाज पाहुयात..
उद्धव ठाकरेंचे व्हील ऑफ फॉर्च्युन काय सांगतं?
जयंती अलुरकर सांगतात की, उद्धव ठाकरेंवर आता या काळात ताण हा राजकीय कमी आणि अपेक्षांचा अधिक असेल. “Wheel of Fortune (Reverse)” हे टॅरोकार्ड उद्धव ठाकरे यांना असे सूचवू पाहात आहे की, काही गेले अथवा संपले म्हणून जगरहाटी थांबत नाही. हे कालचक्र आहे. गोष्टींकडे ज्याप्रमाणे मनुष्य पाहतो त्याचप्रमाणे त्या, त्याच्या आयुष्यात घडत असतात
टॅरो कार्ड रीडर जयंती अलुरकर यांच्या मते, येत्या काळात अपेक्षांच्या ओझ्याने उद्धव ठाकरेंना आरोग्य संबंधित तक्रारी जाणवू शकतात. यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शून्यातून जग निर्माण करण्यासाठी कंबर कसायला हवी आहे. दोषारोप करत बसण्यात फक्त वेळ वाया जाईल, हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे कंबर कसून कामाला लागा असा सल्ला अलुरकर यांनी दिलेला आहे.
हे ही वाचा<< शिवसेना नाव गेलं, चिन्हही गेलं, आता उद्धव ठाकरेंसमोर पुढचं संकट असणार.. ज्योतिष तज्ज्ञांनी वर्तवली भविष्यवाणी
उद्धव ठाकरेंच्या भाग्यात डेव्हील कार्डचा प्रभाव..
ठाकरे यांना आलेले “डेव्हिल” कार्ड हे दाखवत आहे की काही वाईट प्रवृत्ती डोके वर काढण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांनी स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवावी. उद्धव ठाकरेंना येत्या काळात हितशत्रूंचा धोका ओळखून पुढची वाटचाल संयमित व सहज करण्याची गरज आहे. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही उक्ती लक्षात ठेऊन सर्व धुरा त्यांनी स्वतःच्याच हातात ठेवावी. हितशत्रू बरोबर ओळखून त्यांच्यापासून सावध रहावे. कोणतीही गोष्ट अधिक ताणल्यास त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान संभवते.