Shukra Gochar: ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, वैभव, प्रेम, सौंदर्य, विलासी वैवाहिक जीवनाचा कारक मानला गेला आहे. जेव्हा जेव्हा शुक्राच्या राशीत बदल होतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. ३१ मार्च २०२२ रोजी शुक्र राशी बदलेल. शुक्राचा हा राशी बदल मकर राशीतून कुंभ राशीत होईल. शुक्र २७ एप्रिलपर्यंत या स्थितीत राहणार आहे. त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत शुक्राच्या या संक्रमणाचा कोणत्या राशीवर काय परिणाम होईल हे जाणून घ्या.

मेष (Aries): शुक्राचे हे संक्रमण आर्थिक दृष्टिकोनातून लाभदायक आहे. संक्रमणादरम्यान अनेक स्त्रोतांकडून धनलाभ होईल. व्यवसायात आर्थिक लाभाचे लक्षण आहे. यासोबतच भागीदारीच्या कामात धनलाभ होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

(हे ही वाचा: Gemology: ‘हे’ रत्न धारण केल्यास नोकरी-व्यवसायात होते जलद प्रगती!)

वृषभ (Taurus): कामात सुस्तपणा राहील. ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरीत तुम्हाला असुरक्षितता जाणवेल. अनावश्यक खर्च वाढतील. तथापि, कुटुंबातील वातावरण शांत राहील.

(हे ही वाचा: Numerology: ‘या’ जन्म तारखेचे लोकांना नशिबाने नाही तर, कष्टाने कमावतात पैसा)

मिथुन (Gemini): शुक्राचे संक्रमण शुभ आणि लाभदायक ठरेल. या दरम्यान, क्षेत्रात प्रचंड यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या कामाचे कौतुक होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरी बदलण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात. स्थावर मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये लाभ होईल.

/Astrology: एप्रिलमध्ये ‘या’ राशीच्या लोकांचे चमकेल नशीब! नोकरी आणि आर्थिक परिस्थितीत होईल बढती

कर्क (Cancer): शुक्राच्या या संक्रमण काळात दैनंदिन कमाई वाढेल. तसेच तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. शेअर बाजारातून आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये मात्र आर्थिक लाभ होईल.

(हे ही वाचा: Astrology: एप्रिलमध्ये ‘या’ राशीच्या लोकांचे चमकेल नशीब! नोकरी आणि आर्थिक परिस्थितीत होईल बढती)

सिंह (Leo): व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायाचा विस्तार होईल. तसेच, व्यावसायिक भागीदारांशी संबंध सौहार्दपूर्ण असतील. नोकरीसाठी प्रवास करावा लागू शकतो. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. जीवनसाथीसोबतचे संबंध मधुर होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)