Vibhuvani Sankashti Chaturthi: पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात दोन संकष्टी चतुर्थी येतात. यंदा अधिक मास आला आहे. या महिन्यातील प्रत्येक सण, व्रत- वैकल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले असते. यामुळेच ऑगस्ट महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी सुद्धा विशेष आहे. आज, ४ ऑगस्टला असणारे संकष्टी चतुर्थी ही विभुवनीं चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. विशेष म्हणजे ही चतुर्थी दर तीन वर्षांमधून एकदा येते. श्रीगणेशाला आद्यदेवता मानले जाते त्यामुळे गणेश भक्तांसाठी आजचा दिवस हा एक दुर्लभ असा दुग्धशर्करा योग असल्याचे म्हणता येईल. आजच्या संकष्टीला श्रीगणराय स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांना मोदकासारखी गोड बातमी देऊ शकतात. अशा कोणत्या भाग्यवान राशी आहे ज्यांना आजपासून सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकते हे पाहूया..

विभुवनी संकष्टी चतुर्थी तिथी शुभ मुहूर्त

संकष्टी चतुर्थी तिथी प्रारंभ: ४ ऑगस्ट दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपासून
संकष्टी चतुर्थी तिथी समाप्ती: ४ ऑगस्ट, रात्री ९ वाजून ३९ मिनिटे
चंद्रोदयाची वेळ: रात्री ८ वाजून ५२ मिनिटे

गणपती बाप्पांचा आशीर्वाद कोणत्या राशींना लाभणार?

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

स्थावर मालमत्तेच्या कामातून लाभ होईल. घरात चांगल्या बातम्या येतील. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. इच्छापूर्तीचा दिवस.

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

दिवसाची सुरुवात आनंदी होईल. आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल. अडचणीतून मार्ग निघेल. दिवस कार्यपूर्तीत जाईल. गोष्टी मनासारख्या घडून येतील.

धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)

आज जोडीदार तुमच्यावर खुश राहील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदाराशी सलोखा वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. बोलण्यातील व्यर्थता टाळावी.

हे ही वाचा<< गजलक्ष्मी राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या नशिबात अपार धन- संपत्ती? पेढ्यांसारखा गोड होणार तुमचा ऑगस्ट महिना

कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope)

आज दिवसभर मौजमजा कराल. मित्रांचा फड जमवण्याचा प्रयत्न कराल. करमणूक प्रधान दिवस राहील. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. विनाकारण तर्क-वितर्क करू नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)