Vinayak Chaturthi 2023 July: हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा गणेश चतुर्थी असते, यातील पहिल्या पंधरवड्यातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हटले जाते. सध्या अधिक श्रावण महिना सुरु असल्याने श्रावणातील विनायकीचे महत्त्व या चतुर्थीला लाभते. आजच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी व स्वयं गणराज आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. अशातच आता या महिन्याच्या विनायकीला एक दुर्लभ- दुर्मिळ योग सुद्धा जुळून आला आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार विनायक चतुर्थीच्या दिवशीपासून गृह लक्ष्मी राजयोग तयार होत असल्याने काही राशींना प्रचंड फायद्याचे व सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. या राशी कोणत्या व त्यांना कसा फायदा होऊ शकतो हे पाहूया …

गृहलक्ष्मी राजयोग बनल्याने ‘या’ राशींना होणार फायदा?

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

मेष राशीला अचानक व अनपेक्षित धनलाभ झाल्याने मन अगदी आनंदून जाईल. तुमच्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लक्ष्मीचे पाठबळ मिळेल. रागावर खूप नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या माध्यमातून मित्रांना लाभाचे योग आहेत यातून तुम्हाला मानसिक समाधान सुद्धा प्राप्त होऊ शकते. तुम्हाला काही कारणांमुळे प्रवासाचे योग आहेत. गृहलक्ष्मी योगासह आपल्याला संतती प्राप्तीचा सुद्धा योग आहे. मिळकती इतकाच विचार गुंतवणुकीचा सुद्धा कार्य;या हवा.

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

आनंदाचे डोही आनंद तरंग असे काहीसे वातावरण मिथुन राशीच्या वाट्याला येणार आहे. शनीच्या साडेसातीतून मुक्ती झाल्यामुळे २०२३ हे मिथुन राशीच्या प्रगतीचे वर्ष म्हणून ओळखले जात आहे. आणि हीच ओळख गृहलक्ष्मी योगामुळे अधिक बळकट होऊ शकते. तुम्हाला बँकेच्या किंवा अन्य ठिकाणच्या गुंतवणुकीचे लाभ या कालावधीत प्राप्त होऊ शकतात. मिथुन राशीला प्रसंगी इतरांना व अनेकदा स्वतःला शिस्त लावण्याची गरज भासेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. पोटाच्या आजारांचा धोका संभवतो त्यामुळे सकस आहाराकडे लक्ष द्यायला हवे.

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

सिंह राशीला स्वतःच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झाल्याचे जाणवून येऊ शकते. तुमचे मानसिक स्थैर्य बळावल्याने विनाकारण होणाऱ्या वादातून तुम्ही मोकळे होऊ शकता. काही दिवस कुटुंबापासून विभक्त राहावे लागू शकते. कपडे व फॅशन या क्षेत्रात तुमचा रस वाढू शकतो. काही काळ नकारात्मक विचारांचे काळे ढग तुमच्या डोक्यावर घोंगावू शकतात पण अशावेळी तुम्ही ध्यानधारणा, मनःशांती याकडे लक्ष द्यायला हवे. स्वतःला एका रुटीनमध्ये फिट केल्यास तुम्हाला अनेक गोष्ट सवयीने सोप्या होऊ शकतात.

हे ही वाचा<< लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतात ‘या’ राशींचे जोडीदार; तुमच्या पार्टनरची रास आहे का यात?

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

भाग्य आणि दशम स्थानातील रवी, बुधाचे भ्रमण विशेष लाभकारक ठरेल. गुरुबल चांगले आहेच. नोकरी व्यवसायात मोठी झेप घ्याल. त्यात आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होण्याचे योग आहेत. विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे फळ उत्तम मिळेल. जोडीदाराच्या समस्या सोडवताना नातेवाईकांची मदत होईल. खांदे भरून येणे, मान आखडणे असे त्रास संभवतील. गुंतवणूकदारांना कमीतकमी तोटा सहन करावा लागेल. चिंता नसावी. विवाहोत्सुक मंडळींनी जोडीदाराचे संशोधन सुरू ठेवावे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)