स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्न काही ना काही संकेत देते जे आपल्या वास्तविक जीवनाशी संबंधित असते. आपण पाहत असलेली काही स्वप्ने आनंददायी असतात, काही विचित्र आणि काही भीतीदायक असतात. स्वप्नांमध्ये, आपण आपल्याशी संबंधित गोष्टी किंवा लोकांव्यतिरिक्त बरेच काही पाहतो. अनेक वेळा स्वप्नात लोकांना सापांनी वेढलेले दिसते आणि कधी कधी साप त्यांच्या घराभोवती किंवा आजूबाजूला रेंगाळताना दिसतात. या स्वप्नाचे अनेक अर्थ स्वप्न शास्त्रातही सांगण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया की स्वप्नात वारंवार साप दिसणे हे शुभ लक्षण आहे की अशुभ.

स्वप्नात सोनेरी रंगाचा साप
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात सोनेरी रंगाचा साप दिसणे पितृदोषाबद्दल सांगते. म्हणजेच, जर तुम्हाला असे स्वप्न दिसले तर समजून घ्या की तुमचे पितर तुमच्यावर एखाद्या गोष्टीबद्दल नाराज आहेत, म्हणूनच पितरांची पूजा करावी.

आणखी वाचा : बॉलिवूडला मी परवडणार नाही म्हणणाऱ्या महेश बाबूचे आलिशान घर पाहिलेत का?

स्वप्नात पांढरा रंगाचा साप
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप दिसला तर हे स्वप्न शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की लवकरच तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळणार आहेत.

आणखी वाचा : शनिदेव करणार मार्गक्रमण, या ४ राशींच्या लोकांना करिअरमध्ये होणार जबरदस्त फायदा

मृत साप दिसणे
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात मृत साप दिसला तर ते कुंडलीत राहू दोष दर्शवते. त्यामुळे तुम्हाला जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

आणखी वाचा : आपल्या कर्माने श्रीमंत होतात ‘या’ ३ राशीचे लोक, शनिदेवाची त्यांच्यावर असते विशेष कृपा

स्वप्नात साप तुमचा पाठलाग करत आहे
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात साप आपल्या मागे येताना दिसला तर स्वप्न शास्त्रानुसार हे स्वप्न सूचित करते की तुमच्या मनात काहीतरी आहे ज्यामुळे तुम्ही खूप घाबरले किंवा अस्वस्थ आहात .

आणखी वाचा : या २ राशीचे लोक असतात खूप भाग्यवान, ‘मंगळ’ ग्रहाच्या कृपेने जीवनात होतात यशस्वी

अनेक साम एकत्र दिसणे
स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात तुमच्या आजूबाजूला खूप साप दिसले तर ते अशुभ लक्षण मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की नजीकच्या भविष्यात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader