श्रावण महिन्याला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जात असून तो शंकराला समर्पित आहे. या महिन्यातच भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्रा अवस्थेत जातात. तेव्हा महादेव या सृष्टीचे चक्र चालवतात. असे म्हटले आहे की श्रावण महिन्यात महादेवाची उपासना करण्याला महत्त्व असून हा काळ महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उत्तम काळ आहे. त्यातही श्रावणातील सोमवार अधिक महत्त्वपूर्ण मानला गेला आहे.

यावर्षी श्रावण महिना २९ जुलैपासून सुरु होईल आणि २७ ऑगस्टला समाप्त होईल. दरम्यान १ तारखेला श्रावणातील पहिला सोमवार असून दुसरा श्रावणी सोमवार ८ ऑगस्ट, तिसरा १५ ऑगस्ट, आणि चौथा श्रावणी सोमवार २२ ऑगस्टला असेल. या चार श्रावण सोमवारी उपवास ठेवण्यात येतील.

जुलैमध्ये जन्माला आलेले लोक असतात खूपच खास; मिळवतात अफाट यश आणि प्रसिद्धी

श्रावण सोमवारी पूजा करण्याची विधी

श्रावण सोमवारी पहाटे आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. यानंतर उजव्या हातात जल घेऊन श्रावण सोमवार व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करा. महादेवाला पंचामृत (दूध, दही, तूप, अमृत, मध), पांढरे चंदन, पांढरी फुले, धतुरा, बेल, सुपारी इत्यादी अर्पण करा. या दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. धूप दाखवा. देवाला फळे आणि मिठाई अर्पण करा. शक्य असल्यास जानवे आणि कपडेही अर्पण करावेत. श्रावण सोमवार व्रताची कथा वाचा. शेवटी आरती करून प्रसाद वाटप करावा. हा उपवास दिवसभर फळे आणि भाज्यांसोबत ठेवणे चांगले मानले जाते. त्याचबरोबर काही लोक एका वेळी एकच जेवण करूनही हे व्रत पाळतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)