नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी १० हजार रेमडेसिविर अवैधपणे वितरित केल्याबद्दल राज्य सरकारला कारवाईची मुभा आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. नगरमधील विविध रुग्णालयांना रेमडेसिविरच्या १० हजार कुप्या वितरित केल्या असल्याची माहिती स्वत: डॉ. सुजय विखे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर दिली होती. या विरोधात अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या फौजदारी याचिकेत सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने कारवाईची मुभा दिली आहे. अरुण कडू आणि अन्य तिघांनी ही याचिका दाखल केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2021 रोजी प्रकाशित
सुजय विखेंवर कारवाईस मुभा
रेमडेसिविरचे अवैध वितरण
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-04-2021 at 00:33 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken against sujay vikhe illegal distribution of remedivir abn