औरंगाबाद जिल्‍हा परिषदेतील विशेष लेखापरीक्षक सुधाकर अभिमन्यू मुंडे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. मुंडे यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील वडवणी असून ते नोकरीनिमित्त औरंगाबादमध्ये राहत होते. औरंगाबादमधील शिवाजीनगर भागातील सह्याद्री हिल्समध्ये ते राहत होते.

त्यांना दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. सकाळी राहत्या घरात त्यांनी डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पुंडलीकनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला असून आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट आहे.