खरीप हंगाम हातचा गेला असल्याने रब्बीची आशा जागवतच गावोगावी बलपोळा नेहमीच्या उत्साहात नसला तरी पशुधनाचा यथोचित मान ठेवत साजरा झाला.
गेल्या काही वर्षांत पोळासणाच्या वेळेस बल धुण्यासाठीही पाणी नसायचे. या वर्षी दोन महिने पावसाचा रुसवा होता. मात्र, पोळय़ाच्या पाश्र्वभूमीवर चार दिवस आधी पाऊस झाल्यामुळे बल धुवायला पाणी मिळाले. शेतात पिके नसली, तरी आता जनावरांना थोडाबहुत चारा होईल. रब्बी हंगामाची पेरणी होण्याइतकी ओल आताच उपलब्ध आहे. आणखी पाऊस झाला तर रब्बीचा हंगाम हाताशी येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पोळा साजरा केला. बाजारातून आणलेले गोंडे, मटाटय़ा, वेसण, म्होरकी, दावे, सर्व नवे साहित्य बलासाठी खरेदी केले गेले. िशगांना रंग लावून, डोक्याला बािशग बांधून व अंगावर झूल घालून बलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. फटाके, बँडबाजावरील खर्चही शेतकऱ्यांना करणे शक्य नसल्यामुळे त्याला फाटा देण्यात आला. आíथक कुवत नसली तरी बलासाठी गोडधोड करून त्याला पुरणाचा नवेद्य दाखवण्यास शेतकरी विसरला नाही. एखादा दुसरा सण कमी केला तरी चालेल, पण ज्याच्या जिवावर आपण जगतो, त्याचा सण साजरा केलाच पाहिजे ही भावना अजूनही ग्रामीण भागात दृढ आहे. शहरी भागात बलाचा संबंध नसला तरी संस्कृतीची जपणूक करायची म्हणून मातीचे रंगवलेले बल खरेदी करून त्याची पूजा केली गेली. बाजारपेठेत मातीचे बल उपलब्ध होते. त्याची चांगली विक्री झाली.