07 December 2019

News Flash

औरंगाबाद विभागातून ‘भक्षक’ला मुंबईचे तिकीट!

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची औरंगाबादमधील विभागीय अंतिम फेरी मंगळवारी पार पडली. या ुवेळी सादर झालेल्या एकांकिकांमधून मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाने सादर केलेल्या ‘भक्षक’ या एकांकिकेने

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची औरंगाबादमधील विभागीय अंतिम फेरी मंगळवारी पार पडली. या ुवेळी सादर झालेल्या एकांकिकांमधून मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाने सादर केलेल्या ‘भक्षक’ या एकांकिकेने बाजी मारत मुंबईचे तिकीट मिळवले.

विभागीय अंतिम फेरीत दिग्दर्शनासाठीचे पारितोषिकही ‘भक्षक’ एकांकिकेसाठी रावबा गजमल यांना आणि प्रकाशयोजनेचे पारितोषिक चेतन ढवळे यांना मिळाले. जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयाची ‘साधूचा डोह’ ही एकांकिका द्वितीय, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विभागाच्या नाटय़शास्त्र विभागाच्या ‘देवदासी’ या एकांकिकेस तृतीय पारितोषिक मिळाले.
शहरीकरणासाठी होणारी जंगलाची कत्तल आणि त्यामुळे वन्यजीवांवर होणारे परिणाम असा संघर्ष दाखविणारी ‘भक्षक’ ही एकांकिका भाव खाऊन गेली.

First Published on October 7, 2015 12:23 am

Web Title: bhakshak come to mumbai for next round
Just Now!
X