समांतर जलवाहिनीसाठी करण्यात आलेला करार रद्द करावा, अशी शिफारस महापालिका आयुक्तांनी केल्यानंतर गुरुवारी आयोजित सर्वसाधारण सभेत शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. यात नंदकुमार घोडेले आणि राजू शिंदे यांनी एकमेकांची टर उडवली. घोडेले हे समांतर योजनेतील खासदार चंद्रकांत खैरे यांची बाजू लावून धरत होते आणि त्याची भाजपचे काही नगरसेवक टोपी उडवत होते.

समांतरचा प्रवास गेली १० वर्षे सुरू आहे. गेल्या अडीच वर्षांपासून कामाला सुरुवात झाली आहे, असे सांगत शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांनी योजनेचे समर्थन करू, एजन्सीचे नाही अशी भूमिका घेत खासदार खैरे यांनी हा निधी आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे आवर्जून सांगण्याचा प्रयत्न केला. हा निधी परत गेला तर शहराचे नुकसान होईल, असेही ते म्हणाले. खासदार खैरे यांनी पैसे आणले. त्यांनी एजन्सी ठरविली नाही. ती स्थायी समितीने ठरविली. तेव्हा राजू शिंदे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळातच हा करार झाला, असे घोडेले म्हणाले. यावरून शाब्दिक चकमक उडाली. शिंदे म्हणाले की, खैरे अजूनही खासदार आहेत. मग पैसे कसे परत जातील? आणि योजना मंजूर झाली, तेव्हा प्रशासनाने दाखवलेले चित्र चांगले होते. त्यावर अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी काम केले होते. योजना स्थायी समितीने मंजूर केली तेव्हा २४ तास पाणी व मीटरने ते घेतल्यास ९०० रुपयांपर्यंत बिल येईल, असे सांगितले होते. योजनेला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी

स्थायीमध्ये त्याची एजन्सी ठरविली गेली. मात्र, करार करताना एका विशिष्ट पक्षाच्या दोन नगरसेवकांच्या सह्य़ा त्यावर आहेत. कराराची सही जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावर माझी सही नाही, असेही शिंदे यांनी आवर्जून सांगितले.