18 July 2019

News Flash

आचारसंहितेच्या ‘सीव्हिजिल’ अ‍ॅपला संपर्काची अडचण!

मराठवाडय़ातील १५ हजार २०७ मतदान केंद्रांपैकी ६४० ठिकाणी अद्यापि रॅम्प उपलब्ध नाही. ३८६ ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.

(संग्रहित छायाचित्र)

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी केलेल्या सीव्हिजिल (CVigil) हे अ‍ॅप वापरण्यासाठी आंतरजालाची समस्या जाणवत आहे. मराठवाडय़ातील १५ हजार ८४७ मतदान केंद्रांपैकी १८ मतदान केंद्रांभोवती पुरेशी ‘रेंज’ उपलब्ध नसल्याने तेथून तक्रार करणे शक्य होणार नाही. जालना जिल्ह्य़ातील काही भागांतून भ्रमणध्वनीला इंटरनेटशी जोडता येणे अवघड असल्याने रेंज नसणाऱ्या ठिकाणापासून रेंज असणाऱ्या ठिकाणापर्यंत खास दूत पाठवावे लागणार आहेत. मराठवाडय़ात १९० ठिकाणी इंटरनेटसाठी आवश्यक असणारी रेंज कमी होती. मात्र बीएसएनएल आणि अन्य दूरध्वनी कंपन्यांना सुविधा निर्माण करून देण्याच्या सूचना दिल्यानंतर १८ ठिकाणांहून आदर्श आचारसंहितेची ऑनलाइन तक्रार करणे कठीण होणार आहे.  मराठवाडय़ात १५ हजार ८४७ मतदान केंद्रे निर्माण होतील, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र १४००हून अधिक संख्या एका मतदान केंद्रात झाल्यास त्यासाठी साहाय्यक मतदान यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे मतदान केंद्राची संख्या साधारणत: १६ हजार २०८ एवढी होईल, असे निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगतात. या मतदान केंद्रांवर सहा प्रकारच्या सुविधा असायला हव्यात, असे ठरविण्यात आले होते. मराठवाडय़ातील १५ हजार २०७ मतदान केंद्रांपैकी ६४० ठिकाणी अद्यापि रॅम्प उपलब्ध नाही. ३८६ ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.

First Published on March 13, 2019 1:00 am

Web Title: code of conduct cvigil app contact problems