News Flash

थंडी टंचाईची तीव्रता जास्त; जिल्ह्य़ात १०१ टँकरमधून पाणी

थंडीची चाहूल हळूहळू जाणवू लागली असतानाच जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रताही वाढत असल्याचे चित्र आहे

| December 16, 2015 03:31 am

थंडीची चाहूल हळूहळू जाणवू लागली असतानाच जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रताही वाढत असल्याचे चित्र आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्य़ातील ७७ गावांना १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी ४० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रामुख्याने पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठय़ाचे प्रमाण अधिक आहे.
पैठण तालुक्यातील ३३ गावांसाठी ५३, गंगापूर २२ गावांसाठी २५, वैजापूर २० गावांसाठी २२, तर कन्नड २ गावांसाठी १ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पैठणमध्ये १७ तर वैजापूरमध्ये २२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. औरंगाबाद, फुलंब्री, खुलताबाद, सिल्लोड व सोयगाव तालुक्यात अजून टँकर सुरू नसले, तरी टंचाईची तीव्रता सुरू झाल्यास लवकरच येथेही टँकर सुरू होतील, असे सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 3:31 am

Web Title: cold intensity shortage water tankers
टॅग : Cold
Next Stories
1 हिंगोली-अकोला राष्ट्रीय महामार्गाला अखेर मुहूर्त!
2 प्रदूषणाच्या विळख्यात लातूरकरांची घुसमट
3 मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य सचिवांसह १८ जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस
Just Now!
X