जिल्ह्य़ातील दुष्काळ पाहणी दौऱ्यात शिवसेनेच्या पाच मंत्र्यांनी तालुके पिंजून काढत थेट लोकांमध्ये घुसून प्रशासनावर प्रभाव टाकला. या पाश्र्वभूमीवर शिवसनिकांमध्ये वातावरण निर्मिती झाल्याने संघटन बांधणीला पूरक चित्र तयार झाले. काही महिन्यांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही थेट शेकडो गावांतील शेतकऱ्यांना रोख मदत, किराणा सामान वाटप केले. सरकारच्या जलयुक्त शिवाराला पर्यायी ‘शिवजलक्रांती’ योजना सुरू करून अनेक गावांत कामे करीत सेनेच्या मंत्र्यांनी थेट संपर्क वाढवला. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यातच मुंडे भगिनींना इतर विरोधी पक्षांबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचेही आव्हान पेलावे लागणार असल्याचे मानले जाते.
बीड जिल्हा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्याच्या सत्तेत भाजप-शिवसेनेची युती असली, तरी मुंडे यांच्या प्रभावामुळे विधानसभेच्या सहापकी केवळ बीड हा एकच मतदारसंघ सेनेच्या वाटय़ाला आहे. या मतदारसंघातही मागील दोन खेपेला पराभव झाल्याने शिवसेनेचे अस्तित्व संघटन पातळीपुरतेच मर्यादित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतही नाममात्र प्रतिनिधित्व राहिले. मात्र, मुंडेंच्या निधनानंतर राज्यस्तरावरुनच भाजपने युती तोडल्यामुळे सेनेला विधानसभेसाठी उमेदवार मिळवणेही अवघड झाले होते. दिवंगत मुंडे यांच्यानंतर भाजपचे नेतृत्व पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्याकडे आले. सेना नेतृत्वानेही पहिल्या निवडणुकीत फारसे लक्ष घातले नाही. मात्र, भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आणि सहभागी झाल्यानंतरही दुजाभावाची वागणूक देण्याचा प्रयत्न चालवल्याने भविष्यात भाजपपुढे आव्हान उभे करण्यास सेना नेतृत्वाने भाजपच्या बालेकिल्ल्यातच पक्ष संघटन मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी स्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीपासून ते आíथकदृष्टय़ा कमकुवत शेतकऱ्यांना साहित्य वाटप करून थेट सेनेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटनास आले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र थेट बीड गाठून पंचायत समितीच्या बहुतांश गटांपर्यंत निवडक शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत दिली. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही दिवाळीत किराणा सामान वाटप केले. सेनेचे मंत्री विजय शिवतारे, रामदास कदम यांचा सातत्याने जिल्ह्यात संपर्क चालू आहे. दुष्काळी स्थितीत शिवसेनाच सर्वसामान्यांच्या मदतीला येऊ शकते, असा विश्वास देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे. भाजपच्या जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे जोरात सुरू असताना शिवसेनेने ‘शिवजलक्रांती’ योजनेच्या माध्यमातून अनेक गावांत जलसंधारणाची कामे करीत सरकारी योजनेला पर्याय दिला, तर दुष्काळी स्थितीत चारा छावण्या सुरू करतानाही शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रशासनाला आपला प्रभाव दाखवत शिवसनिकांना मोठय़ा प्रमाणात छावण्या मंजूर करून दिल्या.
दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी ११पकी ५ तालुक्यांत सेनेचे मंत्री दाखल झाले. राज्य मंत्रिमंडळात सेनेचे एकूण ९ मंत्री असताना यातील ५ मंत्री या ५ तालुक्यांत पाहणीसाठी आले. सेनेच्या मंत्र्यांनी सरकारी पद्धतीचा दौरा न करता थेट लोकांमध्ये जाऊन संवाद साधत अनेक ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आíथक मदत करीत शिवसेनेबद्दलचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला. मुंडे भगिनींच्या परळी तालुक्यात सेनेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ िशदे यांनी प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरले, तर अंबाजोगाईत परिवहन मंत्री दिवाकर रावते, वडवणीत दीपक केसरकर, आष्टीत संजय राठोड, शिरुरमध्ये दादा भुसे या सेनेच्या मंत्र्यांनी आपल्या स्वतंत्र पद्धतीने शिवसेनाही सत्तेत सहभागी असल्याची जाणीव प्रशासनाला करून दिली.
तब्बल ५ तालुक्यांत सेनेच्या मंत्र्यांनी तालुकाप्रमुख, शाखाप्रमुखासह शिवसनिकांना सोबत घेत प्रभाव निर्माण करण्याची संधी साधली. त्यामुळे भाजपच्या आमदार असलेल्या तालुक्यांमध्ये शिवसनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यात सेनेचे मंत्री यशस्वी ठरले. वर्षभरात होणाऱ्या जि. प., पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे भाजपला लढत देण्यासाठी तयारीला लागल्याचे चित्र असून इतर पक्षांतील प्रभावी नाराज नेते, कार्यकर्त्यांना वळवण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. भविष्यात शिवसेना सर्व निवडणुका स्वतंत्र लढवणार असल्याने राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे आव्हान भाजपच्या मुंडे भगिनींना पेलावे लागणार आहे.

thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता