डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त मराठी संस्कृती समृद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या साहित्य, संगीत, चित्र, नाटय़ व लोककला क्षेत्रातील दहा जणांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी दिली.

राज्यशासनाचा उच्च शिक्षण व तंत्रज्ञान विभाग व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. ज्ञानपीठ विजेते प्रख्यात साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती  ‘मराठी भाषा दिन’ म्हणून मोठय़ा प्रमाणावर साजरी करण्यात येणार आहे.

kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

यानिमित्त विद्यापीठात ग्रंथिदडीसह भरगच्च कार्यक्रम होत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत २७ फेब्रुवारीला मुख्य कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठ नाटय़गृहात सायंकाळी पाच वाजता मुख्य कार्यक्रम होईल. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी साहित्य, कला, नाटय़ व संगीत क्षेत्रातील दहा मान्यवरांचा गौरव करण्यात येईल. या गौरवमूर्तीमध्ये प्राचार्य रा. रं. बोराडे, प्रा. मधू जामकर (साहित्य), पं. नाथराव नेरळकर व पं. विश्वनाथ ओक (संगीत), मुरली लाहोटी व प्रा. दिलीप बडे (चित्रकला), प्रा. अजित दळवी व डॉ. दिलीप घारे (नाटय़), मीरा उमप व निरंजन भाकरे (लोककला) यांचा समावेश आहे. या मान्यवरांना सन्मानचिन्ह, ग्रंथ भेट देण्यात येतील.

याच दिवशी सायंकाळी सहा वाजता ‘आत्मवाणी-अमृतवाणी’ हा कार्यक्रम होणार आहे. मराठी भाषेचा उगमापाूसन आजपर्यंत झालेला प्रवास या कार्यक्रमातून उलगडला जाणार आहे. या कार्यक्रमात मराठीतील उत्तमोत्तम कथा, कविता, नाटय़प्रवेश, ललित लेखन, उत्तम कवितांचे सादरीकरण होणार आहे.

अभिनेते सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, चिन्मय केळकर, उत्तरा मोने, प्रख्यात गायिका उत्तरा केळकर, श्रीधर फडके, मंगेश बोरगांवकर, आर्या आंबेकर, कमलाकर सातपुते व मीरा मोडक हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मराठी भाषाप्रेमिकांना सहभागी होता यावे, यासाठी नाटय़गृहाबाहेर एलसीडीची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे.