28 January 2020

News Flash

प्रा. चंद्रकांत पाटील यांना ‘राष्ट्रीय हिंदी सन्मान’

मराठी व हिंदी भाषेत डॉ. पाटील यांची ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

औरंगाबाद : मराठी व हिंदीचे ज्येष्ठ कवी, अनुवादक, समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना मध्य प्रदेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय हिंदी सन्मान’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्या अिहदी भाषिक लेखकांनी आपल्या सृजनशील लेखनातून हिंदी भाषेला समृद्ध केले आहे, अशा ज्येष्ठ आणि लिहित्या लेखकांसाठी हा सन्मान गेल्या तीन वर्षांपासून दिला जातो.

एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून २०१८ या वर्षांसाठी निवड समितीने पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. १४ सप्टेंबर रोजी भोपाळ येथे   हा पुरस्कार पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे.

मराठी व हिंदी भाषेत डॉ. पाटील यांची ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना यापूर्वी भीष्म साहनी यांच्या ‘तमस’ या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. ‘कवितांतरण’ या त्यांच्या काव्य संपादनासाठी अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे. साहित्य अकादमीतर्फे भारतीय लेखकांच्या प्रतिनिधी मंडळात सदस्य म्हणून  चीन  व विश्व हिदी संमेलनात दक्षिण आफ्रिका  येथे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

First Published on September 11, 2019 4:03 am

Web Title: prof chandrakant patil receives national hindi honor zws 70
Next Stories
1 औरंगाबादेत पावसाचे आगमन
2 १६८० कोटींची नवी पाणी योजना औरंगाबाद शहरासाठी मंजूर
3 जागा वाटपात झुलविण्यामागे अ‍ॅड. आंबेडकरांना रा. स्व. संघाची फूस
Just Now!
X